NCP – SCP Pune | पुणे महापालिकेवर बैलगाडी व टांगा मोर्चा!

HomeBreaking News

NCP – SCP Pune | पुणे महापालिकेवर बैलगाडी व टांगा मोर्चा!

Ganesh Kumar Mule May 18, 2026 9:50 PM

Kasba By-Election | कसबा पोटनिवडणूक | भाजपच्या इच्छुकांकडून जोरदार तयारी सुरु  | महापालिकेकडे मागितले ना हरकत प्रमाणपत्र 
CM Eknath Shinde on Pune Flood | पुण्यातील निळ्या पूररेषेतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा आराखडा तातडीने तयार करा | राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
Deepali Dhumal | Pradeep Dhumal | Yoga Day | वारजे परिसरामध्ये  कायम योग वर्गाचे उद्घाटन | दिपाली धुमाळ आणि बाबा धुमाळ मित्र परिवारचा उपक्रम 

NCP – SCP Pune | पुणे महापालिकेवर बैलगाडी व टांगा मोर्चा!

 

Pune News – (The Karbhari News Service) – पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, पुणे शहरच्या वतीने शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगरपालिकेवर बैलगाडी व टांगा मोर्चा काढण्यात आला. (Pune Breaking News)

यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक ताण याविरोधात निषेध व्यक्त केला. केंद्रातील भारतीय जनता पक्ष सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोप करण्यात आला.

दरवाढ रद्द झाली नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, पुणे शहरच्या वतीने देण्यात आला.

यावेळी गटनेते काकासाहेब चव्हाण, महिला अध्यक्ष स्वातीताई पोकळे, नगरसेवक गफुरभाई पठाण, नगरसेविका अनिताताई इंगळे, रविंद्रअण्णा माळवदकर, दीपक जगताप, अजिंक्य पालकर, अमोघ ढमाले, हर्षद जाधव, प्रवीण तुपे, मकरंद देशमुख, वंदना मोडक, दिलशाद अत्तार, उर्मिला गुंड, जयश्री आदमाने, मेघा सातव तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: