Solapur Dharashiv Rain | अतिवृष्टीमुळे घरं उद्ध्वस्त झाली, पण आशा नाही! | विविध संस्थांच्या वतीने सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात अन्नधान्य वितरण!
Sopaur News – (The Karbhari News Service) – सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात यावर्षीच्या पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाले. सर्वसामान्य माणसे यात भरडून निघाली. मात्र लोकांचे मनोबल वाढवण्यासाठी काही स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत. (Maharashtra Flood)
पुला केअर फाउंडेशन आणि बुप्पोसो फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील 390 कुटुंबांना मोफत अन्नधान्य किटचे वितरण करण्यात आले.
दिवाळीच्या निमित्ताने 1000 झाडांचे वृक्षारोपण करून निसर्गाशीही नव्याने नातं जोडण्यात आलं.
या कार्यात बुप्पोसो फाउंडेशनचे संस्थापक बिपीन लोंढे, सतीश शिरसठ तसेच गोरमाळे गावातील (Gormale Village) फुलचंद पालखे, महालिंग गिराम, सिद्धेश्वर भुसारे, भारत खळदकर, नामदेव घोंगडे, सुहास पालखे व ग्रामस्थ सहभागी झाले.


COMMENTS