Pune Breaking News | मॉडर्न कॉलेजची मान्यता रद्द करण्याची मागणी : नीट पेपर फुटीचे मुख्य सभेत पडसाद

HomeBreaking News

Pune Breaking News | मॉडर्न कॉलेजची मान्यता रद्द करण्याची मागणी : नीट पेपर फुटीचे मुख्य सभेत पडसाद

Ganesh Kumar Mule May 18, 2026 9:27 PM

PMC Fire Hydrant System | पुणे शहराच्या अग्निसुरक्षेला मोठा दिलासा | फायर हायड्रंट प्रणाली उभारणीचा नगरसेवक सुहास विजय टिंगरे यांचा ठराव मुख्य सभेत एकमताने मंजूर
 PMC Officers Promotion | General Body Meeting | मुख्य अभियंता पदावर बढती देण्यात मुख्य सभेची मंजूरी
Amol Balwadkar on BJP | मुख्य सभेत फेरविचाराचा प्रस्ताव आणून निधी रद्द केल्याचा अमोल बालवडकर यांचा आरोप

Pune Breaking News | मॉडर्न कॉलेजची मान्यता रद्द करण्याची मागणी : नीट पेपर फुटीचे मुख्य सभेत पडसाद

 

NEET Paper Leak Case – (The Karbhari News Service) – नीट पेपर फुटीचे पडसाद पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत पाहायला मिळाले. यात मॉडर्न कॉलेजच्या एक प्राध्यापकाचा समावेश होता. त्यामुळे प्रोग्रेसिव एज्युकेशन सोसायटी संस्थेवर कारवाई करण्याची मागणी करत मॉडर्न कॉलेजची मान्यता रद्द करण्याची मागणी काँग्रेस आणि शरद पवार पक्षाच्या नगरसेवकांनी मुख्य सभेत केली. (Modern College Pune)

सोमवारची मुख्य सभा सुरू होताच काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या नगरसेवकांनी मुख्य सभेत घोषणा द्यायला सुरुवात केली. पीइएस संस्थेचा धिक्कार असो, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्या, मॉडर्न कॉलेजची मान्यता रद्द झाली पाहिजे, अशा घोषणा दिल्या.

विरोधी बाकावरील नगरसेवकानी मागणी केली की, नीट परीक्षा रद्द झाल्याने काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केल्या आहेत. त्यामुळे सभा तहकूब केली जावी. त्यानुसार विरोधी पक्षांनी सभा तहकूबी मांडली. मात्र सत्ताधारी पक्षाने याला विरोध केला. त्यामुळे यावर मतदान घेण्यात आले. मात्र विरोधी पक्षाकडे फक्त १९ एवढे संख्याबळ होते. त्यामुळे बहुमताने ही तहकूबी फेटाळली गेली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: