PMC Contract Employees Bonus | महापालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मान्यता! 

HomeBreaking News

PMC Contract Employees Bonus | महापालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मान्यता! 

Ganesh Kumar Mule Oct 10, 2025 8:59 PM

MSRTC Employees | एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट | वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आता वेतनासोबत देणार | दिवाळी अग्रीम म्हणून १२ हजार ५०० रुपये | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
PMC Contract Employees Bonus | Sunil Shinde | कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाबाबत राष्ट्रीय मजदूर संघ (RMS) करणार आमरण उपोषण
PMC Contract Employees Bonus | कंत्राटी कामगारांना अजून बोनस नाही | मनपा ठेकेदारांना काळ्या यादीत टाका | कामगार नेते सुनील शिंदे

PMC Contract Employees Bonus | महापालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मान्यता!

 

PMC Diwali Bonus – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेत बाह्यस्त्रोताद्वारे घेण्यात आलेल्या कंत्राटी कामगारांना किमान वेतनामध्ये बोनस, रजा वेतन व घर भाडे लागू करणेबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समिती समोर ठेवण्यात आला होता. आज झालेल्या स्थाय समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान खूप वर्षांची मागणी मान्य झाल्याने कंत्राटी कर्मचारी आनंद व्यक्त करत आहेत.  (PMC Standing Committee)

 

ही देखील बातमी वाचा : PMC Contract Employees Bonus | महापालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा प्रस्ताव स्थायी समिती समोर | बोनस बाबत धोरण ठरवले जाणार

 

पुणे महानगरपालिकेत बाह्यस्त्रोताद्वारे १०२१६ कंत्राटी कामगारांची सेवा घेण्यात येते आहे. त्यापैकी १३८२ कुशल, ४६६ अर्धकुशल व ८३६८ अकुशल कंत्राटी कामगार आहेत. कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस, रजावेतन व घरभाडे भत्ता अदा करणेबाबत पुणे महानगरपालिका कामगार युनियन ( मान्यता प्राप्त ) व इतर कामगार संघटना यांनी वेळोवेळी मागणी केली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव ठेवला होता. याला आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. (Pune Municipal Corporation – PMC)

कंत्राटी कामगारांना 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, 2 ऑक्टोबर रोजी सुट्टीचा पगार. या दिवशी काम केल्यास डबल पगार व एक पर्यायी सुट्टी दिली जाणार आहे.

———

हा निर्णय पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या जीवनातील ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. मागील सहा वर्षांमध्ये राष्ट्रीय मजदूर संघ मार्फत विविध स्वरूपाच्या आंदोलनांच्या माध्यमातून – गेट मिटिंग, निदर्शने, जागरण गोंधळ, उपोषण – कामगारांचे प्रश्न सातत्याने मांडले गेले.आयुक्त नवल किशोर राम  यांनी कामगारांच्या भावना ओळखून, निर्णयास मान्यता दिली, याबद्दल त्यांचे राष्ट्रीय मजदूर संघ व सर्व कंत्राटी कामगारांच्या वतीने मनःपूर्वक आभार.

  • सुनील शिंदे, अध्यक्ष, राष्ट्रीय मजदूर संघ 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0