PMC Property tax Department | प्रशासन अधिकारी संजय शिवले यांना प्रॉपर्टी टॅक्स विभागातून केले कार्यमुक्त!

HomeBreaking Newsपुणे

PMC Property tax Department | प्रशासन अधिकारी संजय शिवले यांना प्रॉपर्टी टॅक्स विभागातून केले कार्यमुक्त!

गणेश मुळे May 21, 2024 6:31 AM

PMC Sky Sign Department |  Mumbai Hoarding Collapse | PMC Commissioner’s order to take action on unauthorized advertisement boards
Pune Property tax | सिंहगड टेक्नीकल इन्स्टिट्यूटवर मिळकतकर विभागाची जप्तीची कारवाई | ४७ कोटींची थकबाकी
Deputy Commissioner Pratibha Patil has the additional charge of PMC Chief Security Officer!

PMC Property tax Department | प्रशासन अधिकारी संजय शिवले यांना प्रॉपर्टी टॅक्स विभागातून केले कार्यमुक्त!

| भूसंपादन व व्यवस्थापन कार्यालयाकडे काम करण्याचे  आदेश

PMC Property tax Department – (The Karbhari News Service) – महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागात  प्रशासन अधिकारी म्हणून काम पाहणारे संजय शिवले यांना विभागातून कार्यमुक्त करण्यात आले आहे. शिवले यांची पदोन्नती भूसंपादन आणि व्यवस्थापन विभागात प्रशासन अधिकारी म्हणून आधीच झाली होती. त्यामुळे आपल्या मूळ ठिकाणी काम करण्याचे आदेश उपायुक्त माधव जगताप यांनी दिले आहेत. (Pune Municipal Corporation Property tax Department)

संजय सुभाषचंद्र शिवले, अधिक्षक यांची कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडे जून 2023 मध्ये नेमणूक करण्यात आलेली होती. दरम्यान नोव्हेंबर 2023 मध्ये  शिवले यांची तात्पुरती पदोन्नतीने प्रशासन अधिकारी (वर्ग-२) म्हणून भूसंपादन व व्यवस्थापन विभागाकडे नेमणूक करण्यात आलेली होती.  मात्र प्रशासकीय कामकाजाच्या सोईकरिता   शिवले यांना वेतनास भूसंपादन व व्यवस्थापन विभागाकडे व प्रत्यक्ष कामकाजासाठी कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडे कायम ठेवावे. असा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट), यांचेमार्फत अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) यांचेकडे तत्कालीन उपायुक्त अजित देशमुख यांच्या माध्यमातून  निवेदन सादर करण्यात आलेले होते. तथापि, या निवेदनावर आज अखेर पर्यंत निर्णय प्रलंबित आहे.

दरम्यान 8 मे ला अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट), खातेप्रमुखांना आदेश दिले कि शिवले यांना कर विभागातून कार्यमुक्त करा. त्यामुळे उपायुक्त माधव जगताप यांनी आदेश जारी करत शिवले यांना  कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडून उप आयुक्त, भूसंपादन व व्यवस्थापन, कार्यालयाकडे रुजू होण्यास सांगितले. त्यानुसार शिवले हे आपल्या जागी गेले आहेत.

– प्रशासन अधिकाऱ्याचे एक पद रिक्त

दरम्यान शिवले यांना कार्यमुक्त केल्याने प्रॉपर्टी टॅक्स विभागाकडील प्रशासन अधिकारी हे पद रिक्त झाले आहे. विभागाकडे प्रशासन अधिकाऱ्याची तीन पदे आहेत. आता दोनच अधिकारी काम पाहताहेत. रविंद्र धावरे हे प्रभारी आहेत. तर सुनील मते यांच्याकडे सहायक आयुक्त पदाचा देखील प्रभारी पदभार आहे. सध्या 40% सवलत, आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सुरु केलेली वसुली यामुळे या अधिकाऱ्यावर कामाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे तात्काळ प्रशासन अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी करण्यात येत आहे.