PMC Name Policy | नाव देण्यासाठी चार च्या ऐवजी तीन नगरसेवकांची देखील संमती चालणार   : उपसूचना देऊन नाव समितीने धोरण केले मान्य

Homeadministrative

PMC Name Policy | नाव देण्यासाठी चार च्या ऐवजी तीन नगरसेवकांची देखील संमती चालणार  : उपसूचना देऊन नाव समितीने धोरण केले मान्य

Ganesh Kumar Mule May 13, 2026 9:33 AM

Meghna Bordikar Pune Tour | पुणे, पिंपरी चिंचवड शहराची वाढती विजेची गरज विचारात घेऊन बहृत आराखडा तयार करा | ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकाेरे-बोर्डीकर यांच्या वीज अधिकाऱ्यांना सूचना
Clean Toilet Challenge | टॉयलेटसेवा अॅप सत्र २ ची सुरुवात उद्यापासून | घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांची माहिती  
Tata Group Vs PMC Pune | टाटा ग्रुप कडून पुणे महापालिकेची राज्य सरकारकडे तक्रार!  | महापालिका राज्य सरकारला देणार अहवाल

PMC Name Policy | नाव देण्यासाठी चार च्या ऐवजी तीन नगरसेवकांची देखील संमती चालणार!

: उपसूचना देऊन नाव समितीने धोरण केले मान्य

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका हद्दीतील रस्ते, चौक, उड्डाणपूल, वाहनतळ, भुयारी मार्ग तसेच पुणे मनपाच्या मालमत्ता यांना नाव देण्याबाबत धोरण काय असावे, याबाबत महापालिका प्रशासनाकडून प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पक्षनेता सभेने सुरुवातील हा प्रस्ताव ठेवला होता. त्याला मान्यता देण्यात येऊन हा प्रस्ताव नाव समिती समोर ठेवण्यात आला होता. समितीने या धोरणाला मान्यता दिली आहे. मात्र भाजपच्या नगरसेवकांनी यात उपसूचना देऊन बदल केला आहे. त्यानुसार नाव देण्यासाठी चार च्या ऐवजी तीन नगरसेवकांची देखील संमती चालणार आहे. काही प्रभागात भाजपचे तीन नगरसेवक तर एक विरोधी पक्षाचा आहे, त्यामुळे आता या उपसुचनेमुळे विरोध झाला तरी सत्ताधारी पक्षाला विरोधकांवर अवलंबून राहावे लागणार नाही. (PMC Name Committee)

पक्षनेता सभेत देखील दिली होती उपसूचना

रस्ते, चौक, उड्डाणपूल, वाहनतळ, भुयारी मार्ग तसेच पुणे मनपाच्या मालमत्ता यांना नाव देण्याबाबत धोरण प्रशासनाने तयार केले होते. त्यात प्रमुख मुद्दा हा सर्व नगरसेवकांच्या संमतीचा होता. सुरुवातीला हा प्रस्ताव पक्षनेता सभेसमोर ठेवला होता. सभेने  देखील हा प्रस्ताव मान्य करताना एक उपसूचना दिली होती. त्यानुसार शहरातील मोठे प्रकल्प, उद्याने याबाबत नाव देण्याचे कामकाज पक्षनेता सभेपुढे आणून पुन्हा नाव समिती आणि मुख्य सभेसमोर ठेवले जावे. तसेच पूर्वीचा याबाबतचा ठराव देखील निरस्त करण्यात यावा. कारण महापालिका अधिनियमात कुठलीही स्पष्ट तरतूद नाही कि, फक्त राष्ट्रीय ख्यातींच्या व्यक्तींचीच नावे उद्यानांना देण्यात यावीत.

महानगरपालिकेच्या सर्व वास्तूंसाठी देखील हेच धोरण

दरम्यान पक्षनेत्यांनी मान्य केलेला प्रस्ताव नाव समिती समोर ठेवण्यात आला होता. यावर मंगळवार च्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यात देखील उपसूचना देण्यात आली. त्यानुसार आता हे धोरण महापालिकेच्या सर्व वास्तूंसाठी देखील लागू असणार आहे.  चार सदस्यीय प्रभाग पध्दतीमध्ये संबंधित प्रभागातील चारही निर्वाचित स्थानिक सभासदांच्या सुचक व अनुमोदक म्हणून स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. नाव देणेबाबत एकमत न झाल्यास किमान तीन निर्वाचित सदस्यांच्या स्वाक्षरीस मान्यता देण्यात यावी. तसेच पाच सभासदांच्या प्रभागामध्ये पाचही सभासदांची स्वाक्षरीस प्राधान्य द्यावे. तथापि नाव देणेबाबत एकमत न झाल्यास किमान चार निर्वाचित सदस्यांच्या स्वाक्षरीस मान्यता द्यावी.

तसेच दोन प्रभागांच्या सीमारेषेवरील उड्डाणपूल, भुयारी मार्ग असल्यास त्या अंतर्गत येणाऱ्या दोन प्रभागातील एकमताने आठ किंवा एकमत न झाल्यास किमान सहा सभासदांच्या स्वाक्षरी असणे आवश्यक आहे अशी दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच तीन प्रभागांच्या सीमेवर असेल तर सर्व निर्वाचित बारा सदस्यांच्या स्वाक्षरीस
प्राधान्य राहील. तथापि एकमत न झाल्यास किमान नऊ स्थानिक निर्वाचित सदस्यांच्या स्वाक्षरी आवश्यक असतील. तसेच जिथे महापुरुष नांवे दिली जातात त्या ठिकाणी संकल्पना नसावी. भाजपच्या नगरसेवकांनी उपसूचना देऊन हा प्रस्ताव मान्य करण्यात आला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: