Sunil Shinde Congress | शहरातील बेकायदेशीर पार्क केलेली वाहने हटवा | नगरसेवक सुनील शिंदे यांची आयुक्तांकडे बैठक घेण्याची मागणी 

Homeadministrative

Sunil Shinde Congress | शहरातील बेकायदेशीर पार्क केलेली वाहने हटवा | नगरसेवक सुनील शिंदे यांची आयुक्तांकडे बैठक घेण्याची मागणी 

Ganesh Kumar Mule May 12, 2026 10:23 PM

PMC Zonal Medical Officer Promotion | परिमंडळ आरोग्य अधिकारी पदोन्नती | अखेर सेवा नियमावलीत करण्यात आली सुधारणा!  | मुख्य सभेने दिली मान्यता
Pune News | 120 TPH ची कागदपत्रे देऊन 90 TPH हॉट मिक्स प्लांट उभारल्याचा आरोप | माजी विरोधी पक्षनेत्यांकडून आयुक्तांकडे स्वतंत्र चौकशीची मागणी
PMC Pune City AIDS Control Society |  Do you want to get exemption from Income Tax? | Then donate to this organization of Pune Municipal Corporation!  

Sunil Shinde Congress | शहरातील बेकायदेशीर पार्क केलेली वाहने हटवा | नगरसेवक सुनील शिंदे यांची आयुक्तांकडे बैठक घेण्याची मागणी

 

Pune Breaking News – (The Karbhari News Service) –  पुणे शहरात बेवारस वाहनांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. ही वाहने शहरातील रस्त्यावर बेकायदेशीरपणे उभी असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येतो. त्यामुळे ही वाहने हटवण्याची मागणी कॉंग्रेस नगरसेवक सुनील शिंदे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (Pune News)

शिंदे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे कि,  वाहनाचे मालक कोण आहेत ? हि वाहने कोणी पार्क केली आहेत ? याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. अश बेकायदेशीर वाहनांमुळे रस्त्यावरची जागा अडविण्यात आली आहे, यामुळे पादचारी व रस्त्यावरून जाणारी वाहने यासाठी कमी जागा उपलब्ध झाल्यामुळे रहदारीला अडथळा येत आहे. परिणामी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होऊन नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

शिंदे यांनी पुढे म्हटले आहे कि, हातगाडी, पथारीवाले बेकायदेशीरपणे उभे राहिले आपण त्यांचेवर कारवाई करत असतो, परंतु या बेकायदेशीर वाहनाबाबत पालिकेकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तरी यासंदर्भात पोलीस आयुक्त, यांचेशी संपर्क साधून व आर. टी. ओ. प्रमुख यांचेशी संपर्क साधून तातडीने सदर बेकायदेशीरपणे रस्त्यावर लावलेली वाहने हटविणेबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा. आवश्यक असल्यास, पोलीस विभाग, अतिक्रमण विभाग, आर. टी. ओ. विभाग यांची बैठक घ्यावी. अशीही मागणी शिंदे यांनी केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: