PMC JE Exam Results 2026 | पुणे महापालिकेचा कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती परीक्षेचा निकाल जाहीर | QR कोडद्वारे पाहता येणार गुण

Homeadministrative

PMC JE Exam Results 2026 | पुणे महापालिकेचा कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती परीक्षेचा निकाल जाहीर | QR कोडद्वारे पाहता येणार गुण

Ganesh Kumar Mule Jun 09, 2026 6:46 PM

PMC JE Bharti Results | महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती प्रक्रियेत छेडछाड नाही | नावातील साम्यावर प्रशासनाचा खुलासा
PMC JE Exam Results | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) परीक्षा निकाल आचारसंहितेमुळे रखडला | मनपाने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितले मार्गदर्शन
Pune PMC JE Recruitment | राज्य सरकारच्या मार्गदर्शना अभावी दिड वर्षापासून थांबलीय कनिष्ठ अभियंता सरळसेवा भरती प्रक्रिया! | अर्ज केलेल्या २७८७९ उमेदवारांचे काय होणार?

PMC JE Exam Results 2026 | पुणे महापालिकेचा कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती परीक्षेचा निकाल जाहीर | QR कोडद्वारे पाहता येणार गुण

| १६९ पदांसाठी ४१ हजार अर्ज, फक्त २० हजार ७३५ उमेदवार हजर

 

PMC JE Recruitment 2026 – (The Karbhari News Service) –  पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ च्या १६९ पदांच्या भरती परीक्षेचा निकाल आज, ९ जून २०२६ रोजी जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांना आता आपले गुण आणि निकाल सुरक्षित QR कोड लिंकद्वारे महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहेत. पहिल्यांदाच अशा पद्धतीने निकालावर कोड देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना नियुक्ती पत्रे देताना देखील QR कोड दिला जाणार आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (PMC JE Bharti 2026)

हा निकाल https://www.pmc.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. निकालपत्रावर सुरक्षेसाठी QR कोड लिंक समाविष्ट करण्यात आली आहे, जेणेकरून उमेदवारांना तात्काळ आणि अधिकृत पद्धतीने निकाल पडताळता येईल.

१ ऑक्टोबर २०२५ रोजी १६९ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. एकूण ४१ हजार २७२ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. यापैकी फक्त २० हजार ७३५ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. उर्वरित जवळपास ५० टक्के उमेदवार गैरहजर राहिले.

ही परीक्षा IBPS या नामांकित संस्थेमार्फत २२, २३ आणि २९ एप्रिल २०२६ रोजी एकूण ७ सत्रांमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या सात शहरांतील केंद्रांवर परीक्षा पार पडली.

 

याबाबत अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांनी  स्पष्ट केले आहे की, निकालानंतर १:३ या प्रमाणात पात्र उमेदवारांची यादी कागदपत्र पडताळणीसाठी स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. पुढील आठवड्या पासून कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया केली जाणार आहे, असे देखील नायर यांनी सांगितले.

संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. कोणत्याही मध्यस्थ, दलाल किंवा तोतया व्यक्तीच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. खोटी माहिती किंवा पैसे मागितल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे, असे उप आयुक्त किशोरी शिंदे यांनी म्हटले आहे.

दरम्यान या निकालात ज्या उमेदवारांना ९० किंवा त्यापेक्षा अधिक गुण आहेत, त्यांना पास अर्थात उत्तीर्ण समजले जाणार आहे. तर ९० पेक्षा कमी गुण असणाऱ्या उमेदवारांना नापास समजले जाणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: