Pune PMC | पुणे महापालिकेत महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’ | प्रत्येक वॉर्डात रक्तदान ते स्वच्छता मोहीम

PMC Commissioner Circular

Homeadministrative

Pune PMC | पुणे महापालिकेत महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’ | प्रत्येक वॉर्डात रक्तदान ते स्वच्छता मोहीम

Ganesh Kumar Mule Sep 18, 2026 7:38 PM

PMC Solid Waste Management | १ जुलै पासून मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरील फुटपाथसह रस्त्यांची स्वच्छता | घनकचरा विभाग विविध विभागांना सहभागी करून घेणार 
Property Declaration | मालमत्ता विवरणपत्र देण्यास महापालिका क्लास वन अधिकाऱ्यांची उदासीनता 
PMC Additional Commissioner | पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदासाठी नाव डावलल्याबाबत रमेश शेलार यांची राज्याच्या प्रधान सचिवांकडे तक्रार

Pune PMC | पुणे महापालिकेत महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’ | प्रत्येक वॉर्डात रक्तदान ते स्वच्छता मोहीम

| खर्च महापालिकेला स्वनिधीतून करावा लागणार

 

PMC Pune – (The Karbhari News Service) –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्य सरकारने जाहीर केलेले ‘सेवा संकल्प अभियान’ आता पुणे महानगरपालिकेतही राबवले जाणार आहे. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये हे अभियान राबवण्याबाबतचे कार्यालयीन परिपत्रक PMC प्रशासनाने काढले आहे. पुढचा महिनाभर पुणे महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डात रोज एक सेवा उपक्रम दिसणार आहे. याचा खर्च महापालिकेला स्वनिधीतून करावा लागणार असून शासनाकडून वेगळा निधी मिळणार नाही, असेही आदेशात स्पष्ट केले आहे. (Naval Kishore Ram IAS)

मुख्य सचिवांनी 10 सप्टेंबर रोजी घेतलेल्या V.C. आणि राज्य सरकारचे 9 आणि 11 सप्टेंबरचे शासन निर्णय याचा आधार घेऊन हे परिपत्रक काढण्यात आले आहे.

वॉर्डात काय होणार?

परिपत्रकानुसार, महापालिकेतील सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी “सेवा योगदान” कार्यक्रमाचे आयोजन करायचे आहे. यामध्ये युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक यांचा सहभाग घ्यायचा आहे. शिक्षण, कला, साहित्य, क्रीडा व समाजसेवा क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींना सहभागी करून घेण्याच्या सूचना आहेत.

विशेष म्हणजे, या अभियानात स्वच्छता मोहिमेवर भर दिला आहे. राज्यातील समुद्रकिनारे, नदी घाट, बारवांची स्वच्छता करण्याचे आदेश आहेत. पुण्यात मुठा-मुळा घाट, तलाव, ऐतिहासिक बारवांची स्वच्छता केली जाणार आहे. स्वच्छतेनंतर भविष्यात नियमित स्वच्छतेसाठी स्थानिक समिती गठीत करून त्याच ठिकाणी जाहीर कार्यक्रम घेऊन सामूहिक संकल्प घ्यायचा आहे. या सर्व कामाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे आदेश आहेत.

26 सेवांपैकी स्थानिक गरजेनुसार निवड

महापालिका क्षेत्रासाठी 26 प्रकारच्या सेवांची यादी दिली असून, त्यापैकी एक किंवा अनेक सेवांची स्थानिक गरजेनुसार निवड करायची आहे.

1. रक्तदान शिबीर, 2. अनाथालय / वृद्धाश्रम भेट, 3. वृक्षारोपण अभियान, 4. स्वच्छता ही सेवा, 5. आरोग्य तपासणी शिबीर, 6. एक गाव दत्तक – सेवा कार्य, 7. योग आणि ध्यान सत्र, 8. प्लास्टिक-मुक्ती जागरूकता, 9. महिलांचे आरोग्य आणि स्वच्छता, 10. वंचित मुलांसाठी शिक्षण सहकार्य, 11. कारागीर कौशल्य सत्र, 12. ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल साक्षरता, 13. अवयवदान संकल्प अभियान, 14. व्यसनमुक्त भारत जागरूकता, 15. पोषण आणि ॲनिमिया जागरूकता, 16. रस्ते सुरक्षा जागरूकता, 17. जलसंधारण आणि जलस्रोत स्वच्छता, 18. कचरा वर्गीकरण आणि कम्पोस्टिंग, 19. सायबर सुरक्षा जागरूकता, 20. फिट इंडिया खेळ सत्र, 21. वीर गाथा आणि सैनिकांचा सन्मान, 22. दिव्यांगजन सहयोग उपक्रम, 23. मतदार जागरूकता आणि नोंदणी, 24. व्होकल फॉर लोकल सहकार्य, 25. सरकारी योजनांची जागरूकता, 26. विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी सर्व प्रमाणपत्रे.

नोडल अधिकारी कोण?

– या अभियानासाठी सहाय्यक आयुक्त, माहिती व जनसंपर्क विभाग यांना पुणे महापालिकेचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे.
– प्रत्येक क्षेत्रीय / वॉर्ड कार्यालयात संबंधित *वॉर्ड अधिकारी* हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील.
– केलेल्या कामाचे व्हिडिओ, रिल्स, फोटो यांचे संकलन करून माहिती व तंत्रज्ञान विभागाशी समन्वय साधायचा आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: