PMC Junior Engineer Recruitment 2025 |  सामाजिक किंवा समांतर आरक्षणाचा प्रवर्ग बदलण्याच्या संधीचा ३५०० उमेदवारांनी घेतला लाभ! | ३० ऑगस्ट पर्यंत करू शकता अर्ज

Homeadministrative

PMC Junior Engineer Recruitment 2025 |  सामाजिक किंवा समांतर आरक्षणाचा प्रवर्ग बदलण्याच्या संधीचा ३५०० उमेदवारांनी घेतला लाभ! | ३० ऑगस्ट पर्यंत करू शकता अर्ज

Ganesh Kumar Mule Aug 22, 2025 12:30 PM

Prmaod Nana Bhangire on PMC JE Exam | पुणे महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करून फेरपरीक्षा घ्या — प्रमोद नाना भानगिरे
PMC JE Exam Results | निवडणूक विभागाच्या उत्तरात संदिग्धता | कनिष्ठ अभियंता निकालासाठी महापालिका आता भारत निवडणूक आयोगाच्या दारी जाणार!
PMC JE Bharti | कनिष्ठ अभियंता भरती : पेपर फुटीचा आरोप पुणे महापालिकेने फेटाळला | १६९ पैकी १४६ पात्र उमेदवारांना दिली नियुक्तीपत्रे! 

PMC Junior Engineer Recruitment 2025 |  सामाजिक किंवा समांतर आरक्षणाचा प्रवर्ग बदलण्याच्या संधीचा ३५०० उमेदवारांनी घेतला लाभ! | ३० ऑगस्ट पर्यंत करू शकता अर्ज

 

PMC Junior Engineer Recruitment – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिके कडून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ मधील रिक्त पदे सरळसेवेने भरणेसाठी ९ जानेवारी २०२४ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र या प्रक्रिये मराठा आरक्षणचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाने सरकारकडे मार्गदर्शन मागवले होते. याबाबत सरकार कडून मार्गदर्शन प्राप्त झाले आहे. त्यानुसार सरकारने सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार १६९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

दरम्यान या आधी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते, अशा २७८७९ उमेदवारांपैकी वय मर्यादा उलटून गेलेल्या उमेदवारांना देखील अर्ज करण्यास मुभा देण्याचे निर्देश राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले आहेत. त्यामुळे या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. कारण या सर्व उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत. शिवाय या सर्व उमेदवारांना त्यांच्या जातीचा प्रवर्ग सुधारित करण्याची देखील संधी देण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेकडून जाहीर प्रकटन देण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

त्यानुसार  सामाजिक किंवा समांतर आरक्षणाचा प्रवर्ग बदलण्याच्या संधीचा ३५०० उमेदवारांनी लॉग इन करून लाभ घेतला आहे. ही मुदत ३० ऑगस्ट पर्यंत आहे. तोपर्यंत उमेदवारांनी  आपले अर्ज सुधारित करण्यासाठी या लिंकवर https://ibpsonline.ibps.in/pmcjul23  Online पद्धतीने अर्ज करावा.

अधिकची सविस्तर माहिती https://www.pmc.gov.in/l/recruitment या ठिकाणी उपलब्ध असून त्याचे अवलोकन करण्यात यावे. असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाने केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: