PMC Solid Waste Management | दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर निरुपयोगी वस्तूंच्या संकलनाचे महाअभियान | १० ते १२ ऑक्टोबर दरम्यान राबविली जाणार मोहीम
Pune PMC News – (The Karbhari News Service) – येऊ घातलेल्या दिवाळी सणाच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या निरुपयोगी वस्तूंच्या संकलनाचे महा अभियान राबविणेचा निर्णय महापालिका घनकचरा विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. १० ते १२ ऑक्टोबर सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० या कालावधीत सर्व क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रत्येक प्रभागात चिंध्या, उश्या, गाद्या, फर्निचर समारंभाच्या अनुषंगाने घराघरातून निघणारे साहित्य जसे कि, देवी-देवताचे फोटो व इतर साहित्य, ई-कचरा व प्लास्टिक कचरा संकलन मोहीम घेण्यात यावी. असे आदेश उपायुक्त संदीप कदम यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालय आणि परिमंडळ यांना जारी केले आहेत. (Pune Municipal corporation – PMC)
दसरा, दिवाळी व विविध सण समारंभाच्या पार्श्वभूमीवर घरातील जुन्या वस्तू, फर्निचर बदलले जातात. त्याचप्रमाणे गाद्या, उश्या यांचा कचरासुद्धा मोठ्या प्रमाणावर साठून राहतो. अशा प्रकारचा कचरा इतः स्ततः पडू नये याकरिता हा कचरा गोळा करून पुणे महानगरपालिकेच्या सिस्टीममध्ये आणणे व त्यावर RRR (Reduce, Reuse, and Recycle) संकल्पना राबविणे आवश्क आहे.
१०, ११, १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ०९.०० ते सायंकाळी ०५.०० या कालावधीत सर्व क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रत्येक प्रभागात चिंध्या, उश्या, गाद्या, फर्निचर समारंभाच्या अनुषंगाने घराघरातून निघणारे साहित्य जसे कि, देवी-देवताचे फोटो व इतर साहित्य, ई-कचरा व प्लास्टिक कचरा संकलन मोहीम घेण्यात यावी. असे कदम यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
पेहेल उपक्रमांतर्गत जनवाणी, कमिन्स इंडिया फाउंडेशन, के.पी.आय.टी. टेक्नॉलॉजी आदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटीव्ह यांचेमार्फत दिनांक १२ रोजी ई-कचरा व प्लास्टिक कचरा संकलन मोहीम घेण्यात येणार असून संकलित केलेल्या वस्तू संबंधीत क्षेत्रिय कार्यालयामार्फत निश्चित केलेल्या संकलन केंद्रांच्या ठिकाणी संकलित करण्यात याव्यात.
याबाबत संबंधीत संस्थांशी समन्वय साधून जास्तीत जास्त नागरिकांना अभियानाबाबत अवगत करण्यात यावे. सर्व क्षेत्रिय कार्यालयांतर्गत दिलेल्या वेळेत स्वच्छता मोहिमांचे आयोजन करून त्याचा दैनंदिन अहवाल स्वच्छ सर्वेक्षण वॉर रूमकडे सादर करण्यात यावा. असे देखील कदम यांनी आदेश दिले आहेत.

COMMENTS