World  No Tobacco Day | कोथरूड-बावधनमध्ये ‘जागतिक तंबाखू निषेध दिना’निमित्त घनकचरा विभागाची अनोखी जनजागृती मोहीम

Homeadministrative

World  No Tobacco Day | कोथरूड-बावधनमध्ये ‘जागतिक तंबाखू निषेध दिना’निमित्त घनकचरा विभागाची अनोखी जनजागृती मोहीम

Ganesh Kumar Mule May 31, 2026 9:20 PM

Rajiv Gandhi Zoo | राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील चितळ प्राण्यांना विषाणुजन्य आजाराचे संक्रमण
Lokvishwas Pratishthan Goa | लोकविश्वास प्रतिष्ठानच्या दिव्यांग मुलांचे पुण्यात होणार गीतरामायणावर आधारित महानाट्य! | जाणून घ्या तारखा 
Congress| Pune| काँग्रेस तर्फे पोस्टमन काकांची भाऊबीज साजरी

World  No Tobacco Day | कोथरूड-बावधनमध्ये ‘जागतिक तंबाखू निषेध दिना’निमित्त घनकचरा विभागाची अनोखी जनजागृती मोहीम

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – ‘३१ मे जागतिक तंबाखू विरोधी निषेध दिना’निमित्त कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण मिशन २०२६ अंतर्गत प्रभाग क्र. १०, ११, ३१ मधील सर्व आरोग्य कोठ्यांच्या हद्दीत पान विक्री करणाऱ्या दुकानांसमोर जाऊन अनोखी जनजागृती मोहीम राबवली. (PMC Kothrud Bavdhan Ward office)

२० वर्षांपासून सातत्य, यंदा ‘अनोखा प्रयोग’
डहाणूकर कॉलनी व कोथरूड गावठाण आरोग्य कोठीच्या वतीने गेली २० वर्षे घनकचरा व्यवस्थापन विभाग ही मोहीम सातत्याने राबवत आहे. यंदा वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सर्व आरोग्य कोठ्यांवर हा ‘अनोखा प्रयोग’ यशस्वी करण्यात आला.

शारीरिक, मानसिक, आर्थिक दुष्परिणाम’ यावर भर
“तंबाखू सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दुष्परिणाम, तसेच त्यामुळे होणारे आजार याची इत्यंभूत माहिती लोकांपर्यंत पोहोचवून नागरिकांनी व्यसनापासून परावृत्त व्हावे, हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे,” असे सोनवणे यांनी सांगितले.

धक्कादायक आकडेवारी मांडली
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीचा दाखला देत मोहिमेदरम्यान नागरिकांना माहिती देण्यात आली की, “तंबाखूच्या सेवनामुळे जगभरात दरवर्षी लाखो लोकांचा अकाली मृत्यू होतो. जगातील १२% धूम्रपान करणारे भारतीय नागरिक आहेत. भारतात दरवर्षी तंबाखूजन्य सेवनामुळे १० लाख लोकांचा अकाली मृत्यू होतो. निकोटीनमुळे कर्करोग, फुफ्फुस, घसा, तोंडाचे आजार, तसेच हृदयविकार आणि श्वसनाचे गंभीर आजार होतात. विडी, सिगारेट, तंबाखू सेवनामुळे तरुणांचे शारीरिक, मानसिक, आर्थिक, शैक्षणिक नुकसान होऊन व्यसनाच्या अतिरेकामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे.”

पान खाऊन रस्त्यावर थुंकू नका’ – घोषणाबाजी
डहाणूकर कॉलनी, गोपीनाथ नगर, कोथरूड गावठाण, गाढवे कॉलनी, शास्त्री नगर, मुठेश्वर कॉलनी, नवभूमी चौक, विवेकानंद कॉलनी, आझाद वाडी, गुजरात कॉलनी, मयूर कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी, किष्किंधा नगर, भिमनगर, परमहंस नगर, श्रावणधारा वसाहत, भुसारी कॉलनी या परिसरात मोहीम राबवण्यात आली.
यावेळी “पान, तंबाखू, गुटखा खाऊन आपले आरोग्य धोक्यात आणू नका, सार्वजनिक रस्त्यावर थुंकून घाण करू नका, विडी-सिगारेट ओढू नका, कर्करोगांना आमंत्रण देऊ नका, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून आपले हृदय, फुप्फुस, घसा, तोंड विचित्र करू नका” अशा घोषणा देण्यात आल्या.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम यशस्वी
घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त संतोष वारुळे, परिमंडळ कार्यालय क्र. ४ चे उपायुक्त अविनाश सकपाळ, महापालिका सहाय्यक आयुक्त सुहास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वात आरोग्य निरीक्षक करण कुंभार, लक्ष्मीकांत कुलकर्णी, दत्तात्रय दळवी, किरण जाधव, गणेश साठे, जया सांगडे, प्रमोद चव्हाण, निसार शेख, गणेश चोंधे, सचिन सावंत, राजेश आहेर, मोकादम वैजीनाथ गायकवाड, अण्णा ढावरे, अशोक कांबळे, सचिन लोंढे, अक्षय अवघडे, दिनेश नागटिळक, आकाश देवकुळे, ओंकार सोनकांबळे, राहुल चव्हाण, मधुकर वाघमारे आदींनी मोहीम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

नागरिकांनी अशा व्यसनांपासून दूर राहून स्वतःचे व कुटुंबाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान करू नये, असे आवाहन मोहिमेदरम्यान करण्यात आले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: