PMC Holiday | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना भाऊबीज ची सुट्टी जाहीर!

Homeadministrative

PMC Holiday | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना भाऊबीज ची सुट्टी जाहीर!

Ganesh Kumar Mule Oct 09, 2025 7:29 PM

Dr Siddharth Dhende | सामाजिक बांधिलकीतून उजळली दिवाळी – सावली संस्थेतर्फे डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या हस्ते 250 बेघर आणि गरजूंना साड्या व फराळ वाटप
Dr Siddharth Dhende | प्रभाग दोन मध्ये फराळ वाटपातून सर्वसामान्यांची दिवाळी गोड – माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा 20 वर्षे उपक्रम
PMC Fog Canon Machine | दिवाळीच्या फटाक्या मुळे वाढलेले हवा प्रदूषण पाहता महापालिका गुरुवार पासून करणार फॉग कॅनॉन मशीनचा वापर | गेल्या काही महिन्यापासून मशीन होत्या बंद 

PMC Holiday | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना भाऊबीज ची सुट्टी जाहीर!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकारी यांना २३ ऑक्टोबर अर्थात भाऊबीज ची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रन यांनी हे आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

राज्य शासनाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांना १ अतिरिक्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यात दिवाळी सणाच्या भाऊबीज निमित्त देण्यात येणाऱ्या सुट्टीचा समावेश आहे. दरम्यान या आधी नरक चतुर्दशी अर्थात सोमवार ची अतिरिक्त सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार आता दिवाळीच्या सुट्ट्या जवळपास आठवडाभर असणार आहेत. कारण आता सोमवार ते गुरुवार सुट्टी असणार आहे. त्या आधी शनिवार आणि रविवार ची साप्ताहिक सुट्ट्या जोडून आल्या आहेत. त्यामुळे कर्मचारी हर्षोल्लास ने  दिवाळी साजरी करणार आहेत.

दरम्यान महापालिका कर्मचाऱ्यांना नुकताच दिवाळी उचल (Advance)  देण्यात आली आहे. तसेच सानुग्रह अनुदान आणि बोनस देखील लवकरच खात्यात जमा होईल. तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील मुख्य सभेची मंजुरी मिळाल्या नंतर वेतनात बोनस अदा केला जाणार आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: