Corporator Archana Patil | काशेवाडीतील ड्रग्ज प्रकरणावरून नगरसेविका अर्चना पाटील आक्रमक |  पोलीस आयुक्तांसमोर मांडले परिसरातील गंभीर वास्तव

HomeBreaking News

Corporator Archana Patil | काशेवाडीतील ड्रग्ज प्रकरणावरून नगरसेविका अर्चना पाटील आक्रमक | पोलीस आयुक्तांसमोर मांडले परिसरातील गंभीर वास्तव

Ganesh Kumar Mule Mar 11, 2026 2:22 PM

Pune News | स्वारगेट परिसरातील केबल दुर्घटना प्रकरणी तातडीने कारवाई व केबल ऑडिट करा | भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांची मागणी
PMC Deputy Commissioner | घनकचरा व्यवस्थापन विभाग (संकलन) आता उपायुक्त संतोष वारुळे यांच्याकडे | तर घनकचरा (प्रक्रिया) प्रसाद काटकर यांच्याकडे
Pramod Nana Bhangire | शनिवार पेठेत सिलेंडर गेला खड्ड्यात |  प्रमोद नाना भानगिरे यांचा महापालिकेला सवाल

 Corporator Archana Patil | काशेवाडीतील ड्रग्ज प्रकरणावरून नगरसेविका अर्चना पाटील आक्रमक |  पोलीस आयुक्तांसमोर मांडले परिसरातील गंभीर वास्तव

Pune Breaking News – (The Karbhari News Service) – पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ १ च्या वार्षिक तपासणी बैठकीत भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी काशेवाडी (प्रभाग क्र. २२) परिसरातील वाढत्या गुन्हेगारीचा आणि अवैध धंद्यांचा पाढा थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांच्यासमोर वाचला.

काशेवाडीत राजरोसपणे सुरू असलेला ड्रग्जचा व्यापार आणि वेश्याव्यवसाय यावर त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. (Pune News)

या बैठकीत बोलताना अर्चना पाटील यांनी निदर्शनास आणून दिले की, काशेवाडी परिसरात पानपट्टी आणि टपऱ्यांवरून अगदी उघडपणे ‘एमडी’ (MD) सारख्या अमली पदार्थांची विक्री होत आहे. यामुळे अल्पवयीन मुले व्यसनाच्या आहारी गेली असून, ड्रग्ज खरेदी करण्यासाठी ती चोऱ्या करत आहेत. यासोबतच वस्तीमध्ये रात्रीच्या वेळी जुन्या आणि बेवारस गाड्यांच्या आडोशाने तसेच परिसरातील लाईट्स फोडून वेश्याव्यवसायाचे मोठे रॅकेट राजरोसपणे चालवले जात असल्याचे धक्कादायक वास्तव त्यांनी समोर आणले.

स्थानिक काशेवाडी पोलीस चौकीत नागरिकांच्या, विशेषतः महिलांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही आणि त्यांना हाकलून थेट खडक पोलीस ठाण्यात पाठवले जाते, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. अवैध धंद्यांच्या ठिकाणांची यादी वारंवार देऊनही कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त करत, त्यांनी पुन्हा एकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांना यादी सुपूर्द करून तातडीने कारवाईची मागणी केली. अर्चना पाटील यांच्या या रोखठोक खुलाशानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेत, “जर असे प्रकार चालत असतील, तर आपण पुढे काय तोंड दाखवणार?” अशा शब्दांत उपस्थित अधिकाऱ्यांना खडसावले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: