PMC Employees | महापालिकेतील कनिष्ठ अभियंता आणि उप अभियंता यांच्यावर निलंबनाची कारवाई | खातेनिहाय चौकशी केली जाणार
| सामान्य प्रशासन विभागाचे आदेश
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या टीडीआर खर्ची विभागातील कनिष्ट अभियंता शुभांगी तरुकमारे आणि उप अभियंता संदीप मिसाळ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या दोघांची खातेनिहय चौकशी केली जाणार आहे, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विजयकुमार थोरात यांनी हे आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)
पुणे पेठ बाणेर, स. नंबर २१६, हि.नं. ६ येथील मिळकतीवर टी डी आर क्षेत्र खर्ची टाकून मान्य नकाशाव्यतिरिक्त ६ व ७ व्या मजल्याचे काम प्रस्तावित केले आहे. परंतु प्रत्यक्ष जागेवर वाढीव मजल्याचे नकाशा मान्य नसताना ६ व्या मजल्याचे स्लॅबचे काम पूर्ण केले असून ७ व्या मजल्याचे काम सुरु आहे. ही वस्तुस्थिती खात्याने निदर्शनास आणून न देता प्रस्ताव सादर केले असल्याची बाब महापालिका आयुक्त यांचे निदर्शनास आली. त्यामुळे शुभांगी तरुकमारे आणि संदीप मिसाळ यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
खातेनिहाय चौकशी करण्याची जबाबदारी शहर अभियंता यांच्यावर सोपवण्यात आली आहे. दरम्यान या दोघांना महानगरपालिकेचे हद्दीक्षेत्र सोडता येणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.
दरम्यान आजच्या दिवसातील महापालिका प्रशासनाची ही दुसरी कारवाई आहे. या आधी घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक आणि मोकदम यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सुट्टीच्या दिवशी या कारवाई करण्यात आल्या आहेत. एकीकडे महापालिका आयुक्त यांच्या कामकाजाच्या पद्धतीचे कौतुक होत असताना दुसरीकडे महापालिका कर्मचारी मात्र चांगलेच हादरून गेले आहेत.

COMMENTS