PMC Environment Report 2025 | इलेक्ट्रिक बसेसच्या वापराने शहराच्या कार्बन उत्सर्जनाट घट!

Homeadministrative

PMC Environment Report 2025 | इलेक्ट्रिक बसेसच्या वापराने शहराच्या कार्बन उत्सर्जनाट घट!

Ganesh Kumar Mule Jul 29, 2025 9:59 PM

Pune Air Pollution | बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी सेन्सर – आधारित वायू गुणवत्ता तपासणी प्रणाली कार्यान्वित करा | पुणे महापालिकेच्या बांधकाम व्यावसायिकांना सूचना 
PMC Environment Week |पुणे महापालिकेच्या पर्यावरण सप्ताहाचे उद्घाटन 
PMC Environment Department | पुणे महानगरपालिकेत हरित इंधनाच्या वापरासाठी बेकरी असोसिएशनची बैठक संपन्न | प्रणाली स्वीकारली नाही तर कारवाई करण्याचा इशारा 

PMC Environment Report 2025 | इलेक्ट्रिक बसेसच्या वापराने शहराच्या कार्बन उत्सर्जनाट घट!

 

PMC Environment Report – (The Karbhari News Service) – पीएमपीच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेस घेण्यात आल्या आहेत. यामुळे शहराच्या पर्यावरणात सुधारणा झालेली दिसून येत आहे. या वर्षात  ४९० इलेक्ट्रिक बसेसचा एकूण प्रवास ५ कोटी किमी पेक्षा जास्त झाला आहे व यातून ७००० टन कार्बन उत्सर्जनाट घट झाली आहे. अशी माहिती पुणे महापालिकेने सादर केलेल्या पर्यावरण अहवालातून समोर आली आहे. मागील वर्षी ४७३ बसेस होत्या तर या वर्षात ४९० बस वापरल्या जात आहेत. (Pune Municipal Corporation -PMC)

पुणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने नुकताच पर्यावरण अहवाल सादर केला आहे. त्यातून ही माहिती समोर आली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या १७ शाश्वत विकास ध्येये (Sustainable Development Goals) यांना अनुसरून पुणे मनपाचे सध्याचे प्रकल्प व प्रस्तावित धोरणे, कार्यक्रम माहिती इत्यादी बाबतची माहिती या अहवालात  देण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेमार्फत तयार करण्यात आलेला पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल २०२४-२५ हा महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियान’च्या पृथ्वी, वायू, जल, अग्नि आणि आकाश’ या पंचतत्वांवर आधारीत आहे.

तसेच सन २०२२-२३ मध्ये पुणे शहरामध्ये इमारतींच्या छतावरील बसविण्यात आलेली सौर उर्जा क्षमता ७९,६१८ kW  होती. मागील दोन वर्षाच्या तुलनेत  सौर ऊर्जेच्या क्षमतेमध्ये दुप्पट वाढ झाली असून  सन २०२४-२५ मध्ये ती १,६६,५१३ kW इतकी झाली आहे. मागील एका वर्षात ५०,०९७ kW सोलर पॅनल बसविले गेले. सौरऊर्जेमध्ये सर्वात मोठा अंदाजे ६१% वाटा हा रहिवासी इमारतींचा आहे.

२०२३-२४ साली शहारात उद्यानांची संख्या २११ होती. ती वाढून आता २४ झाली आहे. तसेच वृक्षांची संख्या देखील २ लाखाने वाढली आहे. त्याच प्रमाणे पक्ष्यांची संख्या देखील वाढली आहे.

 

 


शहराचा विकास जलद गतीने होत असताना शहराचे पर्यावरण संतुलन राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सन २०२४-२५ चा पुणे शहराचा अहवाल तयार करताना, शहराचा शाश्वत विकास होण्याकरिता पुणे महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना जागतिक स्तरावर मान्य असलेल्या युनायटेड नेशन्सच्या १७ (SDGs) शाश्वत विकास ध्येयांचा विचार केला आहे.  राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान’ हे निसर्गाच्या पंचमहाभूतांवर (पृथ्वी, जल, वायू, अग्नि, आकाश) आधारित असून माझी वसुंधरा अभियानाच्या चौथ्या आवृती MVA 4.0 मध्ये पुणे महानगरपालिकेला विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता. शहराचा विकास होताना पर्यावरणाची सद्य:स्थिती जाणून घेऊन संरक्षण व संवर्धन करण्यासाठी हा अहवाल निश्चितच मार्गदर्शक ठरेल.

नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महानगरपालिका
——-

जागतिक समस्यांना सामोरे जाणेसाठी आणि शाश्वत विकास साध्य करण्यासाठी युनायटेड नेशन्सने सन २०१५ मध्ये १७ शाश्वत विकास ध्येय (Sustainable Development Goals) जगाला सांगितली. पुणे महानगरपालिका देखील पर्यावरणीय समस्या कमी करण्याच्या अनुषंगाने विविध विभागांमार्फत होणारी कामे शाश्वत विकास ध्येयाला धरून करण्याचे प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्र शासनामार्फत देखील राबविले जाणारे माझी वसुंधरा अभियान हे निसर्गाच्या पंचमहाभूते पृथ्वी, वायू, जल, अग्नि व आकाश यांचे संवर्धन करण्यासाठी राबविले जात असून पुणे महानगरपालिका या अभियानाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक विविध प्रकल्प/ उपक्रम राबवीत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग ही अतिशय महत्वाचा असून शालेय विद्यार्थी, नागरिक व खासगी संस्था यांचे माध्यमातून जनजागृती होवून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब होणे अतिशय गरजेचे आहे. मला खात्री आहे की हा अहवाल सर्वाना पुणे शहराचे पर्यावरण जाणून घेण्यासाठी उत्तम मार्गदर्शक ठरेल!

संतोष वारूळे उप आयुक्त (पर्यावरण), पुणे महानगरपालिका

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: