PMC Environment Department | पुणे महानगरपालिकेत हरित इंधनाच्या वापरासाठी बेकरी असोसिएशनची बैठक संपन्न | प्रणाली स्वीकारली नाही तर कारवाई करण्याचा इशारा 

Homeadministrative

PMC Environment Department | पुणे महानगरपालिकेत हरित इंधनाच्या वापरासाठी बेकरी असोसिएशनची बैठक संपन्न | प्रणाली स्वीकारली नाही तर कारवाई करण्याचा इशारा 

Ganesh Kumar Mule Nov 01, 2025 5:16 PM

GBS WHO Guidelines | आरोग्य विभागाने पाणीपुरवठा विभागावर जबाबदारी ढकलली | मात्र WHO च्या गाइडलाइन्स काय सांगतात? फक्त पाण्यामुळेच होतो का हा आजार? 
PMC Fire Brigade | फॉर्म बी वर्षातून दोन वेळा सादर करा |  पुणे महानगरपालिका अग्निशमन दलाचे नागरिकांना जाहिर आवाहन
Pune PMC News | पाणी वाटपापेक्षा अतिरिक्त पाणी पुणे महानगरपालिका उचलत असल्याने दौंड, इंदापूर, पुरंदरचे सिंचनाचे क्षेत्र प्रभावित | जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

PMC Environment Department | पुणे महानगरपालिकेत हरित इंधनाच्या वापरासाठी बेकरी असोसिएशनची बैठक संपन्न | प्रणाली स्वीकारली नाही तर कारवाई करण्याचा इशारा

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत उपआयुक्त (पर्यावरण) रवी पवार यांच्या अध्यक्षतेखाली बेकरी असोसिएशनची बैठक काल (३१ ऑक्टोबर) पार पडली. या बैठकीत स्वच्छ इंधनाचा वापर करून पुणे शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याबाबत चर्चा करण्यात आली. ज्या बेकरी/हॉटेल/रेस्टोरंट/ खाद्यपदार्थ स्टॉल/ ढाबा यांनी अद्याप एलपीजी, पीएनजी, वीज आणि हरित उर्जेच्या इतर आधारित प्रणाली स्वीकारली नाही, त्यांनी तात्काळ रूपांतरण करणे आवश्यक आहे. अन्यथा या संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे बैठकीत सांगण्यात आले. (Pune Municipal Corporation – PMC)

शहरी भागांमध्ये हवा प्रदूषणाचे वाढते गंभीर परिणाम लक्षात घेता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत हवा प्रदूषण कमी करणे करिता याबाबतची मार्गदर्शक तत्वे यापूर्वी जारी करण्यात आलेले असून स्थानिक स्वराज्य संस्थांना याबाबत त्यांच्या हद्दीतील बेकऱ्या, रेस्टॉरंट, ढाबा इत्यादीमध्ये हरित इंधनाचा वापर सुरू करण्यात यावा असे आदेश दिलेले आहेत.

या बैठकीत बेकरी असोसिएशनतर्फे माहिती देण्यात आली की, पुणे शहरात जवळपास 750 बेकऱ्या कार्यरत असून उपनगरात जवळपास 200 ते 250 बेकऱ्या आहेत, त्यांपैकी बहुतेक बेकऱ्यांनी स्वच्छ इंधनाचा वापर सुरू केला आहे. तथापि, काही बेकऱ्या अद्याप रूपांतरणाच्या प्रक्रियेत आहेत. बैठकीदरम्यान बेकरी असोसिएशने स्वच्छ इंधनाचा वापर करण्यासाठी येणाऱ्या अडचणी उप आयुक्तांसमोर मांडल्या. तसेच यासाठी पुणे महापालिकेमार्फत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

हवा (प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९८१ च्या कलम ३१(अ) अंतर्गत हवा प्रदूषण कमी करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) बेकरी/हॉटेल्स/रेस्टोरंट/खाद्यपदार्थ स्टॉल/ ढाबा यांमध्ये लाकूड, कोळसा आणि तंदूर इत्यादीच्या वापराऐवजी एलपीजी, पीएनजी, वीज आणि हरित उर्जेच्या इतर स्रोतांचा अवलंब करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: