Pune Congress | पुणे काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल: आता असणार दोन अध्यक्ष!

HomeBreaking News

Pune Congress | पुणे काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल: आता असणार दोन अध्यक्ष!

Ganesh Kumar Mule May 21, 2026 8:17 PM

Arvind Shinde | MLA Madhuri Misal | MLA Sunil Kamble | आमदार मिसाळ, कांबळे यांचे आंदोलन म्हणजे नौटंकी | अरविंद शिंदे यांचा आरोप
Pune Congress : Agitation Against Governor : राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ शहर काँग्रेसतर्फे ‘‘जोडो मारो आंदोलन’’‌
Congress Pune | महागाई व GST च्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच काँगेस नेत्यांना मोदी सरकार त्रास देत आहे | अरविंद शिंदे

Pune Congress | पुणे काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल: आता असणार दोन अध्यक्ष!

| दिप्ती चवधरी आणि प्रशांत जगताप यांच्याकडे  सूत्रे

| 4 वर्षांनंतर अरविंद शिंदे यांचा निरोप

 

Pune Congress News – (The Karbhari news Service) – पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये मोठा नेतृत्व बदल झाला आहे. पश्चिम विभागाच्या अध्यक्षपदी माजी आमदार दिप्ती चवधरी तर पूर्व विभागासाठी प्रशांत जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस भवनात मावळते अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याकडून दोघांनी पदभार स्वीकारला. पक्षश्रेष्ठींच्या थेट हस्तक्षेपातून झालेली ही निवड आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. (Pune Breaking News)

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांच्या आदेशाने आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने ही नियुक्ती झाली. राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला, कार्याध्यक्ष सतेज उर्फ बंटी पाटील आणि निरिक्षक विनोद सुलतानपुरी यांचीही या निवडीमागे भूमिका होती.

पदभार सोपवताना अरविंद शिंदे भावूक झाले. ‘‘सामान्य कार्यकर्त्याला पुण्यासारख्या शहराचे अध्यक्षपद मिळणे ही माझ्यासाठी आयुष्यातील मोठी गोष्ट होती. 4 वर्षांत निष्ठावान कार्यकर्ते, पदाधिकारी व नगरसेवकांना सोबत घेऊन काम केले. काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या वाढवता आली. अनेक ज्ञात-अज्ञात सहकाऱ्यांमुळे धुरा सांभाळू शकलो.

पदभार स्वीकारल्यानंतर दिप्तीताई चवधरी यांनी पक्षनिष्ठेचा पुनरुच्चार केला. ‘‘एक कार्यकर्ती म्हणून काम सुरू केले आणि आज शहर अध्यक्षपदापर्यंत पोहोचले. हे प्रामाणिक कामाचे फळ आहे. प्रदेशाध्यक्ष सपकाळ, चेन्नीथला, बंटी पाटील आणि पुण्यातील सर्व वरिष्ठांच्या सहकार्याने पक्षहिताचे काम करेन’’, असे त्या म्हणाल्या.
‘‘येणाऱ्या काळात काँग्रेसला नवी ऊर्जा देण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ते व नेते यांच्या विचारांची काँग्रेस उभी करणार आहे.’’ महापालिका निवडणूक तोंडावर असताना संघटना बांधणी आणि गटबाजी संपवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.

सेवादल अध्यक्ष लतेंद्र भिंगारे व ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष द. स. पोळेकर यांनी दिप्तीताईंचा सत्कार केला. यावेळी नगरसेवक रफिक शेख, सुनिल शिंदे, माजी नगरसेवक अजित दरेकर, मेहबुब नदाफ, चंद्रशेखर कपोते, राजेंद्र भुतडा, बाळासाहेब अमराळे, प्राची दुधाने, राजाभाऊ कदम यांच्यासह सोशल मिडीया अध्यक्ष गुलाम हुसेन खान, ऋग्वेदिता सपकाळ, हर्षद हांडे, वैभव डांगमाळी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

पश्चिम पुणे हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. कसबा, शिवाजीनगर, कोथरूड भागातील संघटनात्मक बांधणीसाठी दिप्तीताईंची निवड झाली आहे. तर प्रशांत जगताप यांची पूर्व भागासाठी म्हणजे हडपसर, वडगावशेरी साठी निवड झाली आहे. महिला नेतृत्वाला संधी देऊन काँग्रेसने सामाजिक समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 4 वर्षांनंतर झालेला हा बदल पक्षातील नव्या समीकरणांची नांदी ठरू शकतो.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: