PMC Environment Department | पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यासाठी उपआयुक्त (पर्यावरण) यांच्या मूर्तिकार, कारागीर, उत्पादक यांना सूचना
Pune Municipal Corporation – (The Karbhari News Service) – प्लास्टर ऑफ पॅरीस (POP) पासून बनविलेल्या मूर्तीवर बंदी असल्याने पीओपी (POP) मूर्ती खरेदी करू नये तसेच पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी १२ मे २०२० रोजी मूर्ती बनविणारे कारागीर आणि उत्पादक यांच्यासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत. ०२ जानेवारी रोजी उपआयुक्त (पर्यावरण), पुणे महानगरपालिका यांचे दालनात पुणे परिसरातील मूर्तिकार संघटना यांचेसोबत बैठक आयोजित करून पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यासाठी सुचना देण्यात आल्या आहेत. (Pune PMC News)
मार्गदर्शक तत्वे
१) केवळ नैसर्गिक जैवविघटनशील पर्यावरणास अनुकूल जसे कि, पारंपारिक शाडू माती / चिकणमाती वापरून बनवलेल्या कच्चा मालापासून मूर्ती तयार करणे.
[ कोणताही विषारी अजैविक कच्चा माल तसेच प्लास्टर ऑफ पॅरीस (पीओपी), प्लास्टिक आणि थरमाकोल (पॉलीस्टीरिन) यांचा वापर होणार नाही याची काळजी घेण्यात यावी.]
२) मूर्तींचे दागिने बनविण्यासाठी फक्त वाळलेल्या फुलांपासून बनवलेले साहित्य, पेंढा इत्यादींचा वापर करावा आणि मूर्ती आकर्षक बनविण्यासाठी झाडांची नैसर्गिक उत्पादने जसे की रेझीन्सचा चमकदार सामग्री म्हणून वापर केला जाऊ शकतो.
३) मूर्ती रंगविण्यासाठी पर्यावरणास अनुकूल वॉटर कलर्स, जैवविघटनशील आणि बिनविषारी नैसर्गिक रंगाचा वापर करावा
[ विषारी आणि नॉनबायोडीग्रेडेबल (अविघटनशील) रासायनिक रंग / ऑईल पेंट्स, इनॅमल आणि कृत्रिम रंगावर आधारित पेंटसच्या वापर करण्यास सक्त मनाई आहे.]
४) नैसर्गिक साहित्य आणि रंग वापरून बनवलेले व काढता येण्याजोगे आणि धुण्यायोग्य सजावटीचे कपडे वापरावे. रंगविण्यासाठी फक्त नैसर्गिकरीत्या वनस्पतींपासून तयार होणारे रंग (फुले, साल, पुंकेसर, पाने, मुळे, बिया, फळे) खनिज किंवा रंगीत खडक अशा नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या रंगाचा वापर करावा.
[ विषारी रसायने असलेली डिसपोजेबल साहित्य वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.]
०२/ जानेवारी रोजी उपआयुक्त (पर्यावरण), पुणे महानगरपालिका यांचे दालनात पुणे परिसरातील मूर्तिकार संघटना यांचेसोबत बैठक आयोजित करून पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यासाठी सुचना देण्यात आल्या आहेत. तरी सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते कि, उपरोक्त मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करणारे मूर्तिकार, कारागीर, उत्पादक किंवा व्यावसायिक यांचेकडून मूर्ती खरेदी करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे.
COMMENTS