Deenanath Mangeshkar Hospital Pune | पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू; | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले चौकशीचे आदेश | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली गंभीर दखल

Homeadministrative

Deenanath Mangeshkar Hospital Pune | पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू; | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले चौकशीचे आदेश | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली गंभीर दखल

Ganesh Kumar Mule Apr 04, 2025 6:21 PM

World Olympic Day | महाराष्ट्रातील शहरे, गावखेड्यांत, वाडीवस्त्यांवर क्रीडासंस्कृती रुजवण्यासाठी सामुहिक प्रयत्न सुरु | उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
Pune Nagar Road Traffic  | एनएचआयचा दुमजली उड्डाणपूल थेट रामवाडीपर्यंत | नगर रस्त्यावर येरवडा ते वाघोली आता जा सुसाट
NCP president Sharad Pawar | शरद पवार यांना महाराष्ट्राच्या राजकारणात एवढे महत्व का आहे? 

Deenanath Mangeshkar Hospital Pune | पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू; | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले चौकशीचे आदेश | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली गंभीर दखल

 

Deenanath Mangeshkar Hospital Pune News – (The Karbhari News Service) – पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने  तनिषा भिसे (Tanisha Bhise) या भगिनीला आपला प्राण गमवावा लागला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी दिले आहेत. (Deenanath Mangeshkar Hospital News Today)

या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबतची संपूर्ण माहिती घेतली आहे. आरोग्य विभागाने तातडीने, पारदर्शक आणि निष्पक्षपणे चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णालय प्रशासनाने माध्यमांसमोर त्यांचे म्हणणे मांडले असले, तरी शासन या प्रकरणाचा सर्व संबंधित घटकांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करेल. या घटनेबाबत आंदोलन करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या भावना शासनाने समजून घेतल्या आहेत. चौकशीच्या निष्कर्षानुसार दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. तसेच अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
———-

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकारची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेत या चौकशी समितीत

1) उपसचिव श्रीमती यमुना जाधव,

2) सह कक्षप्रमुख तथा कक्ष अधिकारी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय यांचे प्रतिनिधी,

3) सर जे. जे. रुग्णालय समूह, मुंबईचे अधीक्षक हे सदस्य असतील तर

4) विधि व न्याय विभागाचे उपसचिव/अवर सचिव हे या चौकशी समितीचे सदस्य सचिव असतील.

त्याचप्रमाणे मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या धर्मादाय रुग्ण योजनेची सर्व धर्मादाय रुग्णालयांकडून प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रधान सचिव विधी व न्याय विभाग तसेच धर्मादाय आयुक्त यांना खालील प्रमाणे सूचना केल्या आहेत.

▪ धर्मादाय रूग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व धर्मादाय रुग्णालयांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे ‘धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची’ मान्यता घ्यावी. याबाबत धर्मादाय रुग्णालयांना तत्काळ निर्देश देण्यात यावेत.

▪ विधी व न्याय विभागामार्फत गठीत करण्यात आलेल्या तपासणी पथकामार्फत तपासणी अहवाल व समितीच्या शिफारशी सादर केल्या आहेत. त्या शिफारशींवर तत्काळ कार्यवाही करावी.

▪ शासनामार्फत धर्मादाय रुग्णालयांमध्ये 186 धर्मादाय आरोग्य सेवकांच्या सेवा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर पदे तात्काळ भरण्यात यावीत.

▪ निर्धन रुग्णनिधी (IPF) खात्याबाबतची अद्ययावत माहिती धर्मादाय रुग्णालयांकडून घेवून ती धर्मादाय आयुक्त यांच्या संकेतस्थळावर अद्ययावत करावी.

▪ योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या रुणालयांवर मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार कठोर कारवाई करावी.
——-

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: