PMC Assistant Commissioner | कादबाने, राऊत, दांगट या प्रशासन अधिकाऱ्यांची प्रभारी सहायक आयुक्त पदी नेमणूक! 

Homeadministrative

PMC Assistant Commissioner | कादबाने, राऊत, दांगट या प्रशासन अधिकाऱ्यांची प्रभारी सहायक आयुक्त पदी नेमणूक! 

Ganesh Kumar Mule Jan 03, 2025 9:30 PM

PMC Employees Union Annual Report | पी .एम.सी एम्प्लॉईज युनियनच्या वार्षिक अहवालचे प्रकाशन! 
Dr.  Rajendra Bhosle, IAS take over the charge of Pune Municipal Commissioner!
Dr Rajendra Bhosale IAS | महापालिका आयुक्तांनी खातेप्रमुखांची घेतली ‘शाळा’! 

PMC Assistant Commissioner | कादबाने, राऊत, दांगट या प्रशासन अधिकाऱ्यांची प्रभारी सहायक आयुक्त पदी नेमणूक!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation – PMC) प्रशासन अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या काही अधिकाऱ्यांना महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांनी वेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. या अधिकाऱ्यांना प्रभारी सहायक आयुक्त पदावर नेमणूक केली आहे. यामध्ये दीपक राऊत, लक्ष्मण कादबाने, गोविंद दांगट यांचा समावेश आहे. दरम्यान लेखनिकी संवर्गातील (Clerical Cadre) कर्मचारी सहायक आयुक्त पदी विराजमान झाल्याने आता लेखनिकी संवर्गातील कर्मचारी आनंदी झालेले पाहायला मिळत आहेत. तसेच उप अभियंता यांना देखील प्रभारी सहायक आयुक्त पदाचा पदभार दिला आहे. (Pune Municipal Corporation-PMC)

महापालिक आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी सहायक आयुक्त यांच्या बदल्या नुकत्याच केल्या आहेत. यात प्रशासन अधिकाऱ्यांना सहायक आयुक्त पदाचा पदभार दिल्याने या बदल्यांनी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान हे प्रशासन अधिकारी पदोन्नती मिळण्याची वाट पाहून होते. मात्र तसे न करता आयुक्तांनी प्रभारी पदाचा पदभार दिला आहे. प्रशासन अधिकारी यांच्या सोबत उप अभियंता यांना देखील प्रभारी सहायक आयुक्त पदाचा पदभार दिला आहे.

संजय पोळ, नामदेव भजबळकर, किसन दगडखैर, प्रदीप आव्हाड आणि सुहास जाधव या उप अभियंत्याना प्रभारी सहायक आयुक्त पदाचा पदभार देण्यात आला आहे.
तर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात काम करणाऱ्या बाळासाहेब ढवळे पाटील यांची बदली करत त्यांना हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार देण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी सहायक आयुक्त पदाच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर आता बदल्या केल्या आहेत. आयुक्तांनी या बदल्या करताना अधिकाऱ्यांना आपली कर्तव्ये देखील चोख पार पाडण्यास सांगितले आहे.

 

— असे असतील सहायक आयुक्त आणि क्षेत्रीय कार्यालय

१. संदीप खलाटे – येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालय

२. हेमंत किरुळकर – ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालय

३. संजय पोळ – नगररोड वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय

४. गोविंद दांगट – शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालय

५. गिरीश दापकेकर – औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय

६. विजय नायकल – कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय

७. दिपक राऊत – वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय

८. नामदेव भजबळकर – सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय

९. सुरेखा भणगे – धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय

१०. अमोल पवार – वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय

११. बाळासाहेब ढवळे पाटील – हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालय

१२. लक्ष्मण कादबाने – कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय

१३. किसन दगडखैर – भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय

१४. प्रदीप आव्हाड – बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय

१५. सुहास जाधव – कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0