Pune PMC Officers | राज्य शासनाकडून पुणे मनपात प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांबाबत नगरसेवकांना देखील उत्सुकता! 

Homeadministrative

Pune PMC Officers | राज्य शासनाकडून पुणे मनपात प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांबाबत नगरसेवकांना देखील उत्सुकता! 

Ganesh Kumar Mule May 21, 2026 11:53 AM

PMC New  Recruitment Rules | महापालिकेच्या सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आता आदर्श सामाईक सेवा प्रवेश नियमावली | राज्य सरकारने पुणे महापालिके कडून सेवा प्रवेश नियम, आकृतिबंध बाबत मागितली माहिती
PMC Pune | सुरेखा भणगे यांच्याकडे धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी 
Pune Municipal corporation Health Schemes | डॉ.शामाप्रसाद मुखर्जी आरोग्यविषयक योजना सुरु करण्यासाठी पतित पावन संघटना आक्रमक 

Pune PMC Officers | राज्य शासनाकडून पुणे मनपात प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांबाबत नगरसेवकांना देखील उत्सुकता!

| बदलीनंतरही पुन्हा मनपात रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – राज्य शासनाकडून पुणे महानगरपालिकेत सध्या एकूण 32 अधिकारी प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. अशी माहिती उप आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग) यांनी नगरसेविका दिपाली संतोष डोख यांच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरात दिली आहे. (Dipalee Dokh PMC)

कोणत्या पदावर किती अधिकारी?

महापालिका आयुक्त: 1

अतिरिक्त महापालिका आयुक्त: 3

मुख्य लेखापरीक्षक: 1

आरोग्य प्रमुख: 1

उप आयुक्त: 10

शिक्षणाधिकारी (माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभाग): 1

प्रशासकीय अधिकारी: 1

सहायक आयुक्त: 11

उप संचालक, नगर रचना: 1

नगर रचनाकार: 1

प्रशासन अधिकारी: 1

एकूण: 32

 

सर्व 32 अधिकारी महापालिका आयुक्त यांनी नेमून दिलेल्या ठिकाणीच कार्यरत आहेत. इतर ठिकाणी आदेश दिल्यावर रुजू होत नाहीत, असा दावा प्रशासनाने फेटाळला आहे.  बदलीनंतर पुन्हा पुणे मनपात?: काही शासकीय अधिकारी बदली झाल्यावर देखील पुन्हा पुणे मनपात रुजू होऊन 7-8 वर्षे कार्यरत राहतात, ही बाब सेवक कामकाज कालावधी नियमावलीनुसार योग्य आहे का, या प्रश्नावर प्रशासनाने उत्तर टाळले. प्रतिनियुक्तीचे अधिकार महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग यांचेकडे असल्याने मनपा स्तरावरून स्पष्टता देता येणार नाही, असे उत्तरात म्हटले आहे.

अतिरिक्त आयुक्त पदाच्या नेमणुका रखडल्या:

महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाच्या निर्णयानुसार अतिरिक्त आयुक्त भरण्याच्या कार्यपद्धतीनुसार निर्णय घेतला आहे. याबाबत  एप्रिल महिन्यात महापालिका आयुक्त यांचेकडे निवेदन सादर करण्यात आले असून प्रकरण कार्यवाहीत आहे.  असे प्रशासनाने म्हटले आहे.

प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची संख्या व त्यांच्या कार्यकालाबत अनेकदा नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. बदली होऊनही पुन्हा त्याच महापालिकेत वर्षानुवर्षे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे स्थानिक अधिकाऱ्यांच्या संधींवर परिणाम होत असल्याची चर्चा आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: