PMC 75th Anniversary Special | पुणे महापालिका पुणेकरांना उपलब्ध करून देणार विषमुक्त भाजीपाला आणि फळे!
| मार्च महिन्यात २ शेतकरी आठवडी बाजार सुरू होणार
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) पुणेकरांना शेतकरी आठवडी बाजाराच्या माध्यमातून विषमुक्त भाजीपाला आणि फळे उपलब्ध करून देणार आहे. एकूण ४ आठवडे बाजार सुरू केले जाणार आहेत. त्यातील बाजार मार्च महिन्यात सुरू करण्यात येणार आहेत. अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी (Prithviraj B P IAS) यांनी दिली. (Pune Municipal Corporation – PMC)
महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार महाराष्ट्रात “संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार अभियान” हा
घटक राबविला जात आहे. शेतकरी आठवडी बाजार म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पादनांची थेट विक्री करण्यासाठी आयोजित केला गेलेला बाजार आहे. शेतकरी आठवडी बाजार मध्ये शेतकरी आपल्या भाज्या, धान्य, दूध, कडधान्ये आणि इतर कृषी उत्पादनं थेट ग्राहकांना विकतात. या घटकांतर्गत ग्रामीण भागातील स्वच्छ ताजा भाजीपाला व फळे यांचा शहरी भागात पुरवठा करणे, तसेच शेतकरी बांधवांना पर्यायी बाजारपेठ उपलब्ध करून देणे व त्यांना रोजगाराची संधी निर्माण करून देणे, हे मुख्य उद्देश आहेत. (Pune PMC Anniversary)
त्या अनुषंगाने “जागतिक बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र शासन, कृषी विभाग, यांचे मार्फत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात ७०% निधी हा जागतिक बँक, २७% निधी हा राज्य शासन हिस्सा तर ३% निधी हा खाजगी उद्योगक्षेत्राच्या माध्यमातून (CSR) माध्यमातून उभा केला जाणार आहे. या प्रकल्प अंतर्गत “अर्बन फुड पायलट” हा पथदर्शी प्रकल्प पुणे महानगरपालिकेच्या प्रकल्प अंमलबजावणी कक्षा मार्फत राबविण्यात येत आहे. या पथदर्शी प्रकल्पातील शेतकरी आठवडे बाजारांच्या दर्जा मध्ये सुधारणा करुन, शहरी भागातील ग्राहकांना विषमुक्त आणि ताजी फळे व भाजीपाला वाजवी दारात उपलब्ध व्हावा व शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळावा, तसेच नागरिकांची वहातुक कोंडीतुन मुक्तता होणे करिता, पुणे महानगरपालिकाच्या हद्दीतील ॲमेनीटी स्पेस लोहगाव, बाणेर, पाषाण, बावधन व बालेवाडी या ठिकाणची जागा शेतकरी आठवडे बाजारासाठी निवड करण्यात आली आहे.
कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)
पुणे, मार्फत निवड केलेल्या समुदाय आधारित संस्थाना (CBO) व शेतकरी उत्पादक कंपनी यांना आठवड्यातील एक दिवसा करिता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पुणे मनपा हद्दीतील विविध ठिकाणच्या ठराविक मोकळ्या जागावर आठवडे बाजार भरविण्याकरिता सुद्धा प्रस्ताव महापालिकेकडे प्रस्तावित आहे.
या उपक्रमातुन नागरिकांना स्वच्छ, ताजी, विषमुक्त, फळे व भाजीपाला वाजवी दरात मिळणार आहे. तसेच
शेतकरी बांधवाना शेतमाल विक्री करण्याकरिता हक्काची जागा अल्प दरात उपलब्ध होणार आहे. तरी नागरिकांनी बाजारात जाऊन फळे व भाजीपाला याची खरेदी करावी या साठी जनजागृती कार्यक्रम शेतकरी आठवडी बाजार परिसरात घेणे अपेक्षित आहे.
शेतकरी आठवडी बाजारामुळे शेतकरी व ग्राहक यांना यामुळे खालील फायद्यांचे लाभ मिळतीलः
1. शेतकऱ्यांसाठी थेट विक्रीचा फायदा: शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांच्या थेट विक्रीमुळे उत्पादनांच्या सर्वोच्च
मूल्याची प्राप्ती होते. त्यांना उत्पादकांनी अधिक मूल्य मिळवण्याचा फायदा होतो.
2. वृध्दीतून कमी मध्यस्थ शुल्क: बाजारात उत्पादन विकताना मध्यस्थांच्या कमी होणारे शुल्क शेतकऱ्यांना थेट लाभ देतात.
3. ग्राहकांना ताजे आणि स्थानिक उत्पादन मिळतेः ग्राहकांना ताज्या आणि स्थानिक उत्पादनांचा लाभ मिळतो, ज्यामुळे त्यांना चांगली गुणवत्ता आणि फळे, भाज्या आणि इतर उत्पादने ताजे मिळतात.
4. समाजात संवाद वाढवतो: आठवडी बाजारात शेतकरी आणि ग्राहकांमध्ये थेट संवाद होतो, ज्यामुळे त्यांच्या गरजांचा आणि अपेक्षांचा आदान-प्रदान होतो.
5. स्थानीय अर्थव्यवस्थेला चालना: स्थानिक बाजारपेठेला प्रोत्साहन मिळते, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि रोजगाराची संधी वाढते.
6. महापालिकेला मिळकतः ओटामार्केट मधील गाळे भाडे, ॲमेनीटीस्पेस मधील स्टॉल भाडे यांच्या मार्फत
मिळणा-या मोकळ्या जागेतील स्टॉलचे भाडे हे महानगरपालिका पालिकेसाठी मिळकतीचे साधन होईल.
प्रकल्पाचा उद्देश
१. शहरातील नागरिकांचा अन्न पोषणाचा स्तर उंचावणे.
२. शाश्वत अन्न व्यवस्था- शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतीमाल व उत्पादने थेट शेतकरी ते ग्राहक विक्री
व्यवस्था निर्माण करणे.
३. शहरी भागातील नागरिकांना स्वच्छ, ताजे, गुणवत्तापूर्ण पोषणयुक्त फळे, भाजीपाला, मांस उपलब्ध करून देणे.
—-
या प्रकारच्या बाजाराची संकल्पना ग्रामीण भागात कृषी उत्पादनांचे विपणन सुधारण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या
आर्थिक स्थितीला मजबुती देण्यासाठी महत्त्वपूर्ण होणार आहे. तसेच ग्राहकांना देखील विषमुक्त भाजीपाला मिळणार आहे.
– पृथ्वीराज बी पी, अतिरिक्त महापालिका आयुक्त.
COMMENTS