BJP Pune | जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने ७५५०० झाडे लावण्याचा संकल्प

Homeadministrative

BJP Pune | जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने ७५५०० झाडे लावण्याचा संकल्प

Ganesh Kumar Mule Jun 05, 2026 6:12 PM

Pune Shivsena | भाजपने त्या माजी नगरसेवकांना तंबी द्यावी अन्यथा… | शिवसेनेचा इशारा !
BJP Pune | पुणे शहर भाजपची पाच लाख सदस्यांची नोंदणी | शहराध्यक्ष धीरज घाटे यांची माहिती
Ram Mandir Celebration | श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना दिनानिमित्त २२ जानेवारीला दरवर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा  | श्रीनाथ भिमाले यांची नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी 

BJP Pune | जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने ७५५०० झाडे लावण्याचा संकल्प

 

Pune News – (The Karbhari News Service) – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एक पेड मा के नाम या संकल्पनेला अनुसरून भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने ३०२०बूथ वर प्रत्येकी २५ झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. ७जून पर्यंत चालणाऱ्या ह्या अभियानात सुमारे ७५५०० झाडे लावण्यात येणार आहेत. अशी माहिती शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली. (World Environment Day 2026)

यावेळी बोलताना घाटे म्हणाले, शहरात मोठ्या प्रमाणात काँक्रेट चे जंगल झाले आहे. ज्यामुळे निसर्गाला हानी पोहोचत आहे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे हे प्राणवायू स्रोत आहेत. तीच नष्ट होत असतील तर शहरांची परिस्थिती भयंकर होईल म्हणून भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक पेड माँ के नाम ‘ संकल्पना मांडून वसुंधरा मातेला एक प्रकारे वंदन केले आहे. याचेच अनुसरणं पुणे शहरतील भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता करेल हा विश्वास आहे.

या पर्यावरण पर्वा निम्मित स्वच्छता अभियान देखील मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार असल्याचे घाटे यांनी नमूद केले आहे. या अभियानासाठी पश्चिम महाराष्ट्राच्या संयोजिका म्हणून खासदार डॉ मेधा कुलकर्णी यांची तर पुणे शहराच्या संयोजिका म्हणून नगरसेविका व पुणे शहर सरचिटणीस प्रियांका शेंडगे -शिंदे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: