PMC 75th Anniversary | पुणे महापालिका सर्व माजी नगरसेवकांना आणणार एकत्र!
| सामाजिक आणि कला क्षेत्रातील लोकांना देखील केले जाणार सहभागी
Pune Municipal Corporation -(The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation – PMC) स्थापनेस १५ फेब्रुवारी रोजी ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त महापालिका आपला अमृत महोत्सवी वर्धापनदिन (PMC 75th Anniversary) साजरा करणार आहे. या निमित्ताने महापालिका सर्व माजी नगरसेवकांना (Ex Corporators) एकत्र आणणार आहे. तर सामाजिक, कला, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग असणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून (PMC Civic Body) सर्वांना वैयक्तिक रित्या निमंत्रण दिले जात आहे. महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) आणि अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी (Prithviraj B P IAS) यांची ही संकल्पना आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. (Pune Municipal Corporation – PMC)
अमृत महोत्सवी वर्धापनदिनाच्या निमित्ताने महापालिकेच्या वतीने १५ फेब्रुवारी, शनिवार रोजी सायंकाळी ६ वाजता चहापान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्या निमित्ताने सर्वांना निमंत्रण देण्यात येत आहे. यात सर्व माजी नगरसेवकाना एकत्र आणण्याचा महापालिकेचा मानस आहे. १९५२ सालापासून महापालिकेत नगरसेवक कार्यरत होते. यातील बरेचसे लोक हयात नाहीत. मात्र १९८६ सालापासून असणारे बरेच माजी नगरसेवक विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. या सर्वांची यादी महापालिकेने तयार केली असून सर्वांना महापालिका प्रशासनाकडून निमंत्रण देण्यात आले आहे. त्यासाठी जवळपास २ हजर पत्रिका छापण्यात आल्या आहेत. यामध्ये माजी महापौर, माजी उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, आजी माजी सर्व आमदार आणि खासदार अशा सर्वच लोकप्रतिनिधी यांचा समावेश आहे. (Pune PMC News)
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पुण्यात वास्तव्य आहे. त्यामुळे त्यांना देखील निमंत्रित करण्यात ऐल आहे. त्याचबरोबर शिक्षण मंडळ अस्तित्वात असताना जे अध्यक्ष आणि सदस्य होते, त्यांना देखील निमंत्रित करण्यात आले आहे. शिवाय पीएमपीएमएल चे सर्व माजी संचालक यांना देखील पत्रिका देण्यात आल्या आहेत. तसेच शहरातील सर्व शासकीय विभागात काम करणारे आयएएस यांना देखील निमंत्रित केले गेले आहे.
त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित लोक, पुणे शहरातील कला क्षेत्रातील कलाकार, शहरातील विविध वर्तमानपत्र आणि प्रसार माध्यमे यांचे संपादक आणि वरिष्ठ पत्रकार, शहरातील मानाच्या गणपतींचे अध्यक्ष, महापालिकेचे सेवानिवृत्त विभागप्रमुख आणि अतिरिक्त आयुक्त, महापालिकेच्या पुरस्कार समितीवर असणारे विविध लोक, अशा सर्वांना चहापान साठी निमंत्रित करण्यात आले आहे.
अमृत महोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्ताने एकत्र येऊन महापालिकेच्या विकासा बाबत गप्पा गोष्टी होतील आणि त्यातून नवीन दिशा मिळेल, हा या कार्यक्रमा मागचा हेतू असल्याचे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
COMMENTS