PMC 75th Anniversary | पुणे महापालिकेच्या ४३ व्या फळे, फुले व भाजीपाला प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी!

Homeadministrative

PMC 75th Anniversary | पुणे महापालिकेच्या ४३ व्या फळे, फुले व भाजीपाला प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी!

Ganesh Kumar Mule Feb 13, 2025 9:06 PM

Pu La Deshpande Udyan Pune | पु. ल. देशपांडे उद्यानात आजपासून महिला बचत गट खाद्य महोत्सव
 Pune Municipal Corporation’s (PMC) 42nd Fruits, Flowers and Vegetables Competition and Exhibition on 10th and 11th February!
Pune Municipal Corporation’s 42nd Fruits, Flowers and Vegetables Exhibition inaugurated by PMC Commissioner Vikram Kumar!

PMC 75th Anniversary | पुणे महापालिकेच्या ४३ व्या फळे, फुले व भाजीपाला प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी!

 

PMC Garden Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्ताने (PMC Anniversary) ४३ वे फळे, फुले व भाजीपाला स्पर्धा व प्रदर्शन १५ व १६ फेब्रुवारी २०२५ करीता छत्रपती संभाजीराजे उद्यान येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन शनिवारी १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता राजेन्द्र ब भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) महापालिका आयुक्त व प्रशासक यांचे शुभहस्ते करण्यात येणार आहे. अशी माहिती मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे (Ashok Ghorpade PMC) यांनी दिली. (Pune Municipal Corporation – PMC)

फुले, फळे व भाज्या, झाडे किंवा रोपे यांचे प्रदर्शन आयोजित करणे तसेच असे प्रदर्शन आयोजित करण्यासाठी खाजगी व सार्वजनिक संस्थांना सहाय्य करणे आणि झाडे वनस्पती यांचे मानवी जीवनात जे महत्वाचे स्थान आहे. त्याबद्दल लोकमत तयार करणे या उद्देशाने उद्यान व वृक्ष प्राधिकरण यांचे विद्यमाने दरवर्षी अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित करण्यात येते.

या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एकूण १२ विभाग असून २१० उपविभाग आहेत. त्यामध्ये शोभिवंत पाना फुलांच्या कुंड्याची मांडणी, औषधी वनस्पतींचा संग्रह गुलाब, पुष्पांची मांडणी, हंगामी फुले, टेबल सजावट, वेगवेगळ्या प्रकारची फुले, भाजीपाला सॅलेड सजावट, फळे, भाजीपाल्यावर प्रक्रिया करून तयार केलेले पदार्थ विविध प्रकारचे हार, पुष्प गुच्छ, शिंपले, वेण्या, गजरे प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. विविध प्रकारचे डेलिया, आर्किड, अॅन्थुरीअम, जरबेरा गुलाब, कार्नेशन इ. प्रकारची हंगामी तसेच बहुवार्षिक फुलझाडे या प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण आहे.

या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या उद्यानाच्या प्रतिकृती पाहण्यासाठी तयार करण्यात येणार आहेत. सदरहू प्रदर्शनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामध्ये भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ दि. १६/०२/२०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता छत्रपती संभाजीराजे उद्यान, येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने पुणे विद्यापीठ, मेट्रो, नदी सुधारणा प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, एन. डी. ए., सी.एम ई. वन विभाग, राजीव गांधी प्राणी संग्राहायल, पर्यावरण केंद्र, पुष्करणी, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, फ्रेंडस ऑफ बोन्साय, पिंपरी -चिंचवड महानगरपालिका इ. विभाग / संस्था सहभागी होणार आहेत.

या प्रदर्शना मध्ये बोन्साय, काष्ठ शिल्प, फीचर्स गार्डन, कागदी कलाकुसर, पुणे महानगरपालिकेच्या वास्तूची प्रतिकृती, शेतकरी राजा, ध्येय स्मृती प्रतिकृती, विविध प्रकारच्या पुष्परचना इ. नागरिकांना पहावयास मिळणार आहेत. तसेच माझी वसुंधरा, वृक्ष लावा, वृक्ष जगवा, अशा प्रकारच्या संकल्पना साकारण्यात येणार आहेत. तसेच पुणे महानगरपालिकेस ७५ वर्षे होत असल्याने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध प्रकारच्या रंगीबेरंगी पुष्परचना सजावटी मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहेत.

या प्रदर्शनामध्ये फुले, फळे वृक्षांची रोपे, बागकाम साहित्य, बी बियाणे, खते यांचे विक्रीचे स्टॉल राहणार असून नागरिकांनी दि. १५ व १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ८:०० ते सायंकाळी ८:३० वा. पर्यंत विविध बाग विषयक वस्तू / साहित्य खरेदी करता येईल. सदरचे प्रदर्शन नागरिकांसाठी विनामुल्य खुले असून याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन  अशोक दि. घोरपडे, मुख्य उद्यान अधिक्षक तथा सदस्य सचिव, वृक्ष प्राधिकरण यांनी केले आहे. ——

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0