PM Awards | पंतप्रधान पारितोषिक योजनेसाठी प्रस्ताव पाठवण्याच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना
| प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना गौरवले जाणार
PMC Officers – (The Karbhari News Service) – लोक प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या केंद्र व राज्य शासनातील अधिकाऱ्यांना गौरविण्यासाठी “पंतप्रधान पारितोषिक योजना २०२५ प्रस्तावित करण्यात आली आहे. या योजनेसाठी प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना महापालिका अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर (Pavneet Kaur IAS) यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केल्या आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)
केंद्र शासनाच्या प्रशासनिक सुधार व लोक गाऱ्हाणी विभागाद्वारे लोक प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या केंद्र व राज्य शासनातील तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकाऱ्यांना गौरविण्यासाठी पंतप्रधान पारितोषिक योजना २०२५ योजना राबविण्यात येत आहे. योजनेची नोंदणी व प्रवेशिका अपलोड करण्यासाठी http://pmawards.gov.in हे पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. या पोर्टलवर संबंधित अधिकारी व कार्यालये, विभागप्रमुखांनी १५ नोव्हेंबर या कालावधी पर्यंत नोंदणी करणे व प्रस्ताव सादर करण्याबाबत राज्य शासनाकडून कळविण्यात आलेले आहे.
पुरस्कारांचे स्वरुप
श्रेणी १ – Holistic Development of Districts – ५ पुरस्कार
श्रेणी २- Aspiriational Blocks Programme – ५ पुरस्कार
श्रेणी ३- Innovation – ६ पुरस्कार
असे एकूण १६ पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहेत.
अतिरिक्त आयुक्त याच्या परिपत्रका नुसार पुणे महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी / खातेप्रमुख / विभागप्रमुख यांना सूचित करण्यात आले आहे कि, “पंतप्रधान पारितोषिक योजना २०२५” च्या योजनेची माहितीपत्रिका अवलोकन करून त्यामधील बाबींचे अनुषंगाने http://pmawards gov.in या पोर्टलवर प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही करावयाची आहे.

COMMENTS