Bavdhan DP Road | बावधन परिसरात ताब्यात आलेल्या जागेत ३६ मी डीपी रस्ता करण्याच्या अतिरिक्त आयुक्तांच्या सूचना

Homeadministrative

Bavdhan DP Road | बावधन परिसरात ताब्यात आलेल्या जागेत ३६ मी डीपी रस्ता करण्याच्या अतिरिक्त आयुक्तांच्या सूचना

Ganesh Kumar Mule Nov 03, 2025 8:20 PM

Punyabhushan | ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना २०२३ चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर
Archana Tushar Patil | काशेवाडीमध्ये शेकडो महिलांच्या हस्ते ‘महाआरती’
Sanjay Raut Vs Devendra Fadanvis | संभाजीराजे छत्रपती उमेदवारीवरून राऊत-फडणवीस आमने सामने 

Bavdhan DP Road | बावधन परिसरात ताब्यात आलेल्या जागेत ३६ मी डीपी रस्ता करण्याच्या अतिरिक्त आयुक्तांच्या सूचना

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील बावधन पाषाण हा रस्ता चांदणी चौक येथून सुरू होऊन संरक्षण विभागाच्या हद्दीपर्यंत ३६ मीटर असा डीपी रस्ता आहे. पश्चिम उपनगरातील राहणारे नागरिक यांच्या करिता असणारा असा हा रस्ता असल्याने डीपी प्रमाणे पूर्ण क्षमतेने रुंदीकरण होण्यासाठी आज  अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश  दिवटे यांनी महानगरपालिकांच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांचे समवेत पाहणी आयोजित केलेली होती. (PMC Additional Commissioner Omprakash Divate)

यावेळी मालमत्ता विभागाचे उपायुक्त प्रशांत ठोंबरे, भूसंपादन विभागाचे उपायुक्त निखिल मोरे, पथ विभागाचे अधिक्षक अभियंता, उपअभियंता, बांधकाम विभागाचे उप अभियंता, ड्रेनेज विभागाचे उपअभियंता, कोथरूड बावधन चे क्षेत्रीय अधिकारी असे सर्व अधिकारी व कर्मचारी, माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील उपस्थित होते.

| वन विभागातील ४० गुंठे जागा रुंदीकरणात

या रस्त्याच्या लांबीपैकी बहुतांश लांबी ही एफएसआय टीडीआर च्या माध्यमातून मनपाच्या ताब्यात आलेली असून ताब्यात आलेल्या जागेच्या ठिकाणी पूर्ण ३६ मीटर रस्ता करणे बाबत सूचना अतिरिक्त महापालिका आयुक्त यांनी पथ विभागास दिल्या. तसेच वन विभागातील साधारणतः ४० गुंठे जागा ही रस्ता रुंदीकरणांमध्ये येत असून सदरची जागा ताब्यात घेण्यासाठी मा.जिल्हाधिकारी कार्यालय येथे पाठपुरावा चालू असून डिसेंबर महिना अखेरपर्यंत सदरची जागा ताब्यात घेणे बाबतच्या स्पष्ट सूचना यावेळी मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त यांनी दिलेल्या आहेत. यावेळी रस्ता विकसित करताना ड्रेनेज लाईन त्याचबरोबर पावसाळी ड्रेनेज लाईन यांचीही कामे समांतर रितीने करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

| दिलीप वेडे पाटील यांचा पाठपुरावा

या कामाच्या विलंबामुळे परिसरातील नागरिकांना वाहतुकीची मोठी गैरसोय, साचलेल्या पाण्यामुळे अस्वच्छता आणि आरोग्यविषयक समस्या भेडसावत होत्या. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावर चिखल व पाणी साचल्याने वाहनचालक व पादचारी दोघांनाही त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर मा. नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी अनेक वर्षांपासून या कामासाठी सातत्यपूर्ण आणि ठामपणे पाठपुरावा केला आहे. त्यांनी प्रशासनाच्या विविध स्तरांवर बैठक घेत कामाची गती वाढविण्याचा सातत्याने आग्रह धरला होता.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: