M J Pradip Chandren IAS | अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रन यांची  बदली | अवघ्या ७ महिन्यात बदली केल्याने आश्चर्य व्यक्त 

Homeadministrative

M J Pradip Chandren IAS | अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रन यांची  बदली | अवघ्या ७ महिन्यात बदली केल्याने आश्चर्य व्यक्त 

Ganesh Kumar Mule Oct 28, 2025 7:01 PM

PMC Labour Welfare Fund | कामगार कल्याण निधीचे सदस्य म्हणून काम करण्यास इच्छुक कर्मचाऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन 
M J Pradip Chandren IAS | महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवापुस्तका बाबत महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे महत्वाचे आदेश | पेन्शन प्रकरणांना मिळणार गती 
PMC Employees Promotion | अखेर उप अधीक्षक पदावरील कर्मचाऱ्यांना अधीक्षक पदी मिळाली पदोन्नती! | The कारभारी च्या बातमीचा परिणाम! 

M J Pradip Chandren IAS | अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रन यांची  बदली | अवघ्या ७ महिन्यात बदली केल्याने आश्चर्य व्यक्त

 

Pavneet Kaur IAS – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रन यांची राज्य सरकार कडून बदली करण्यात आली आहे. ६ मार्च ला चंद्रन यांना पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्त करण्यात आले होते. मात्र अवघ्या ७ महिन्यात बदली केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान महापालिका कर्मचाऱ्यांची पदोन्नती किंवा त्यांच्या संबंधित इतर प्रकरणे लवकर मार्गी लावणारा अतिरिक्त आयुक्त अशी चंद्रन यांची ओळख झाली होती. मात्र आता त्यांची बदली झाली आहे. (PMC Additional Commissioner)

 

ही देखील बातमी वाचा : M J Pradip Chandren IAS | पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी एम जे प्रदीप चंद्रन!

 

पवनीत कौर नवीन अतिरिक्त आयुक्त

 

दरम्यान  शासनाने चंद्रन यांची  बदली केली असून, त्यांची नियुक्ती, प्रकल्प अधिकारी, मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट), पुणे या पदावर डॉ. एच.एस.वसेकर( IAS) यांच्या जागी ते पद निवड श्रेणीत उन्नत करून केली आहे. चंद्रन यांच्या  जागी अतिरिक्त आयुक्त म्हणून पवनीत कौर (IAS) यांची नियुक्ती केली आहे. शासनाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी या बाबतचे आदेश जारी केले आहेत.

तसे पाहता सरकार कडून ३ वर्षांनी  अधिकाऱ्यांच्या  बदल्या केल्या जातात. मात्र चंद्रन यांनी अवघ्या ७ महिन्यात बदली करण्यात आली आहे. या अगोदर काही अतिरिक्त आयुक्त हे साडे तीन वर्षाहून अधिक काळ पुणे महापालिकेत कार्यरत होते. त्यांच्या बदलीची मागणी केली जात होती, तरी सरकार कडून आदेश जारी होत नव्हते. मात्र या वेळी लवकर बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: