Pink E Rickshaw Yojana | पिंक ई- रिक्षा योजना | पुणे महापालिकेला एवढ्या महिलांचे अर्ज भरून घेण्याचे टार्गेट!
Pune PMC News – (The Karbhari News Service) – महिलांना रिक्षा व्यवसायासाठी अर्थसहाय्य देणारी पिंक ई- रिक्षा योजना राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पुणे शहरातील ३ हजार महिलांचे अर्ज भरून घेण्याचे टार्गेट पुणे महापालिकेला देण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत १३५ अर्ज आले आहेत. अशी माहिती महापालिका समाज विकास विभागाच्या वतीने देण्यात आली. (PMC Social Development Department)
पुणे शहरातील महिलांना पिंक रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजु महिलांना रोजगारासाठी पिंक (गुलबी) ई- रिक्षा ही योजना राज्यात लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि महिला बालकल्याण विभाग यांच्यासोबत महापालिकेला समन्वय साधावा लागणार आहे.
योजनेचे स्वरूप-
ई रिक्षाची किमतीमध्ये सर्व (करांच्या GST Registration Road Tax, ect) समावेश आहे, नागरी सहाकरी बँका/जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राष्ट्रीयकृत बँका/ अनुज्ञेय असलेल्या खाजगी बँकाकडून ई रिक्षा किमतीच्या ७० % कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, राज्य शासन २० टक्के अधिक भार उचलेल, योजनेची लाभार्थी महिला / मुली यांच्या १० टक्के आर्थिक भार असेल. कर्जाचा परत फेड कालावधी ५ वर्षे (६० महिने).
योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता-
लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे. अर्जदार वय २० ते ४० वर्षे दरम्यान असणे अनिवार्य आहे.
योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
लाभार्थी कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रूपये ३.०० लाखापेक्षा जास्त नसावे.
विधवा, कायदयाने घटस्फोटित, राज्य गृहामधील इच्छुक प्रवेशित यांना प्राधान्य देण्यात येईल.
तसेच दारिद्र्य रेषेखालील महिलांना सुद्धा प्राधान्य देण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे –
अर्जा सोबत लाभार्थ्यांचे आधार कार्ड व पॅन कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्रातील / मतदानकार्ड / शाळा सोडलेचे प्रमाणपत्र, कुटूंब प्रमुखांना उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न ३.०० लाखापेक्षा कमी) किंवा पिवळे /केसरी रेशनकार्ड, बँक खाते पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो, मतदार ओळखपत्र (१८ वर्षपूर्ण झाल्यानंतर मतदार यादी नाव असल्याचा दाखला),रेशनकार्ड, सदर रिक्षा ही लाभार्थी महिलाच चालविणार असल्याचे हमीपत्र, सदरयोजनेच्या अटि- शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र, कर्जबाजारी नसल्याचे हमीपत्र.
या योजनेचे अर्ज क्षेत्रिय कार्यालयामधील समाज विकास विभागामध्ये कार्यालयीन वेळेत उपलब्ध असून भरलेले अर्ज कागदपत्रांसहीत या ठिकाणीच जमा करणेत यावे. असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
COMMENTS