Shivsena UBT Pune | शिवसेना ठाकरे गटाच्या ५ माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट!
PMC Elections – (The Karbhari News Service) – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे माजी ५ नगरसेवक भाजप मधे प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. यांमध्ये बाळासाहेब ओसवाल, विशाल धनवडे , प्राची आल्हाट, संगीता ठोसर, पल्लवी जावळे यांचा समावेश आहे. या सर्वांनी आज नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दरम्यान एम यातील बहुतेक जणांना स्थायी समिती सह विविध पदांची जबाबदारी देण्यात आली होती. पक्षाने एवढे देऊनही भाजप मधे जाण्याच्या त्यांच्या या निर्णया बाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. (Upcoming PMC Election)
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव करत महायुतीने बहुमतांनी निवडून येत राज्यात सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच पार पडतील अशी अपेक्षा आहे. यादृष्टीने राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून महायुतीकडे सत्तेचा कल दिसून येत असल्याने राजकीय चलबिचल सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवसेना उबाठा गटातील पाच माजी नगरसेवक पाच जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पक्षातील नेत्यांना भेटत नसून विकासकामे पूर्ण करण्यासाठी मदत करत नसल्याचा आरोप संबंधित माजी नगरसेवकांनी केला आहे. ५ जानेवारी रोजी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या माजी नगरसेवकांचा प्रवेश होणार आहे. बाळासाहेब ओसवाल, विशाल धनवडे , प्राची आल्हाट, संगीता ठोसर, पल्लवी जावळेहे नगरसेवक भाजपात प्रवेश करणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका मध्ये देखील मोठ्या प्रमाणात यश मिळवण्याच्या दृष्टीने महायुती मधील पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे .
| शिवसेना संघटन बांधणी करणार
दरम्यान महापालिका निवडणूक कधीही लागू शकते, अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्व पक्ष त्या दृष्टीने तयारी करू लागले आहेत. शिवसेना (शिंदे गट) पक्षाने संघटनात्मक बांधणीची तयारी सुरू केली आहे. आगामी निवडणुकीच्या निमित्ताने नवीन पदाधिकारी नेमले जाणार आहेत. शहर अध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे यांनी या बाबत माहिती दिली आहे.
COMMENTS