Kasba Constituency | पाणीपुरवठा आणि कचरा मुक्त कसब्यासाठी अहवाल सादर करून तात्काळ कार्यवाही करा – आमदार हेमंत रासने  | कसबा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आमदार रासनेंनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

Homeadministrative

 Kasba Constituency | पाणीपुरवठा आणि कचरा मुक्त कसब्यासाठी अहवाल सादर करून तात्काळ कार्यवाही करा – आमदार हेमंत रासने | कसबा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आमदार रासनेंनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

Ganesh Kumar Mule Jan 01, 2025 8:22 PM

Devendra Fadnavis | कसब्यातील लोकांचा आशिर्वाद मागण्यासाठी पुन्हा येऊ ..! असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Hemant Rasane | Pune Lok Sabha | पुण्यात हेमंत रासने यांच्याकडून होणार 370 किलो पेढे वाटप! कसबा मतदारसंघात भाजपाकडून विजयोत्सवाची जोरदार तयारी
Code of conduct | By-election | विधानसभा पोटनिवडणूक | चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे

 Kasba Constituency | पाणीपुरवठा आणि कचरा मुक्त कसब्यासाठी अहवाल सादर करून तात्काळ कार्यवाही करा – आमदार हेमंत रासने

| कसबा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आमदार रासनेंनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

 

MLA Hemant Rasane – (The Karbhari News Service) – कसबा मतदारसंघातील (Kasba Peth Constituency) विविध प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांना गती देण्यासंदर्भात आज आमदार हेमंत रासने (MLA Hemant Rasane) यांनी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वीच पाणी पुरवठा आणि कचरा मुक्त कसबा अभियानासाठी प्रशासनाच्या सोबतीने मतदारसंघात पाहणी करण्यात आली होती, हे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्या संदर्भातील अहवाल आठवडाभरात सादर करून तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी रासने यांनी यावेळी केली. (PuneMunicipal Corporation – PMC)

कसबा मतदारसंघात पाणी पुरवठ्या संदर्भात नागरिकांच्या तक्रारी असून नियमित व योग्य दाबाने पाणी पुरवठा होईल याची दक्षता घेण्यात यावी, रस्त्यात पडलेले खड्डे बुजविणे तसेच गरज असेल तिथे डांबरीकरण, ड्रेनेज, उद्यानांमधील व्यवस्था, विविध विकास कामांसाठी निधीची तरतूद करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

यावेळी आमदार हेमंत रासने म्हणाले, “नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कसबा मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या मताधिक्याने मला त्यांचा सेवक म्हणून काम करण्याची संधी दिली. निवडणुकीदरम्यान मतदारसंघाच्या विकासासाठी मांडलेल्या संकल्पना पूर्ण करण्यासाठी पहिल्या दिवसापासून कामाला सुरवात केली आहे. मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित असून ते लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आज आयुक्त आणि विविध खाते प्रमुखांची भेट घेतली, हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाकडून देखील सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

यावेळी मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, सरचिटणीस अमित कंक, प्रणव गंजीवाले, राजू परदेशी, उमेश अण्णा चव्हाण, चंद्रकांत पोटे, प्रशांत सुर्वे, वैशालीताई नाईक, राणीताई कांबळे, शहर सरचिटणीस प्रमोद कोंढरे आणि नगरसेवक राजेश येनपुरे, अजय खेडेकर, योगेश समेळ, आरती कोंढरे, मनीषाताई लडकत ,धनंजय जाधव तसेच मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

———-

आमदार रासने यांनी आयुक्त राजेंद्र भोसले यांची भेट घेतल्यानंतर सर्व विभाग प्रमुखांना मतदारसंघातील कामासंदर्भात अहवाल सादर करण्यास सांगत, उद्या (दि २) रोजी दुपारी तीन वाजता सर्वांची बैठक आयुक्तांनी बोलावली असल्याचं रासने यांनी सांगितल आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0