Naval Kishore Ram IAS | अनधिकृत फ्लेक्स लावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून दंड तर घेतला जाणारच | शिवाय आता प्रिंटींग प्रेस ला देखील महापालिका आयुक्त यांचा इशारा
Pune Illegal Hoardings – (The Karbhari News Service) – पुणे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड, बॅनर लावले जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होण्याबरोबरच अपघात देखील होतात. तसेच शहराचे विद्रुपीकरण होत आहे . यापुढील काळात परवानगी न घेता अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड, बॅनर लावल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध शहर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. संबंधित व्यक्तीला १०००/- रुपये दंड (प्रती बोर्ड) करण्यात येऊन कारवाईसाठी येणारा खर्च देखील वसूल केला जाणार आहे. (PMC Sky Sign Department)
शिवाय ज्या प्रिंटिंग प्रेस मध्ये सदरचे फ्लेक्स बोर्ड बॅनर छापले जातात त्यांनी पुणे महानगरपालिकेची पूर्व परवानगी घेतल्या खेरीज कोणतेही छपाई फ्लेक्स, बोर्ड, बॅनर व पत्रके छापण्यात येऊ नयेत त्याचबरोबर मशीन परिमिट व साठा परवाना या सारख्या आवश्यक असणाऱ्या सर्व परवानगी घेऊनच प्रिंटिंग प्रेस सुरू ठेवण्यात यावी. असा इशारा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे.
त्या अनुषंगाने शहरांमध्ये कुठेही अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड, बॅनर लागणार नाहीत याची दक्षता संबंधित सहाय्यक आयुक्त यांनी घ्यावयाचे आहे अनधिकृत फ्लेक्स बोर्ड बॅनर आढळून आल्यास संबंधित सहाय्यक आयुक्त यांना जबाबदार धरण्यात येईल. शहर पोलीस मार्फत अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड, बॅनर लावणाऱ्यांवर महाराष्ट्र मालमत्तेस विरूपणास प्रतिबंध करण्या करीता अधिनियम, १९९५ ( The Maharashtra Prevention of Defacement of Property Act, 1995)
अंतर्गत संबंधीतांवर पोलीस स्टेशन मध्ये रितसर फिर्याद देऊन एफ.आय.आर नोंदविण्यात येईल. असे देखील आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

COMMENTS