PMC Election Voter List | मतदार यादी विभाजनाचे काम होणार प्रभाग निहाय | अंतिम प्रभाग यादी तयार करण्यासाठी अधिकाऱ्यांची देखील नेमणूक

Homeadministrative

PMC Election Voter List | मतदार यादी विभाजनाचे काम होणार प्रभाग निहाय | अंतिम प्रभाग यादी तयार करण्यासाठी अधिकाऱ्यांची देखील नेमणूक

Ganesh Kumar Mule Oct 08, 2025 11:39 AM

Additional holidays | PMC Pune | महापालिका कार्यालयांना अतिरिक्त सुट्ट्या
PMC Contract Employees Bonus | पुणे म.न.पा. कंत्राटी कामगारांचा मतदानावर बहिष्कार | कामगारनेते  सुनिल शिंदे
Maharashtra School Timing | राज्यातील चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊनंतर भरणार | राज्य सरकारचे आदेश जारी

PMC Election Voter List | मतदार यादी विभाजनाचे काम होणार प्रभाग निहाय | अंतिम प्रभाग यादी तयार करण्यासाठी अधिकाऱ्यांची देखील नेमणूक

PMC Election 2025 – (The Karbhari News Service) – राज्य निवडणूक आयोगच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करीता प्रभागांच्या भौगोलिक सीमानुसार विधानसभा मतदार यादी विभाजनाचे काम करणे आवश्यक आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरीता प्रभागांची मतदार यादी विभाजनासाठी प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने प्रभागनिहाय काम केले जाणार आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. दरम्यान यात म्हटले आहे कि, प्रभागानुसार विधानसभा मतदारयादी विभाजनाचे कामकाजासाठी क्षेत्रीय कार्यालयाकडील उपलब्ध अभियंता वर्ग, आरोग्य निरीक्षक व इतर अधिकारी व कर्मचारी यांचे स्वतंत्र आदेश क्षेत्रीय कार्यालय स्तरावर काढण्यात यावेत. (Pune Municipal Corporation – PMC Election 2025)

 

दरम्यान प्रभाग निहाय विभाजन केलेली अंतिम प्रभाग मतदार यादी तयार करून ती प्रसिद्ध करण्यासाठी  दोन उपायुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार प्रभाग १ ते १२, २५, २७ ते ३५ अशा एकूण २२ प्रभागांसाठी उपायुक्त रवी पवार यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर प्रभाग क्रमांक १३ ते २४, २६, आणि ३६ ते ४१ अशा एकूण १९ प्रभागांसाठी उपायुक्त निखील मोरे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

तसेच महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणूक विषयक कामाचे प्रशिक्षण देण्यासाठी निवडणूक प्रशिक्षण देखील स्थापन करण्यात आला आहे.

असे  होणार प्रभाग निहाय कामकाज

येरवडा धानोरी कळस क्षेत्रीय कार्यालय – १, २, ६

नगररोड वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय – ३, ४, ५

शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालय – ७, १२

औध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय – ८, ९

कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय- १०, ११, ३१

ढोलेपाटील रोड क्षेत्रीय कार्यालय – १३, १४

हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालय – १५, १६, १७

वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय – १८, १९, ४१

बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय – २०, २१, २६

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय – २२, २३, २४

कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय – २५, २७, २८

वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय – २९, ३०, ३२

सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय – ३३, ३४, ३५

धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय – ३६, ३७, ३८

कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय – ३९, ४०

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: