PMPML Deficit | पीएमपीच्या तुटीत सातत्याने वाढ | महापालिकेवर दरवर्षी मोठा आर्थिक बोजा

Homeadministrative

PMPML Deficit | पीएमपीच्या तुटीत सातत्याने वाढ | महापालिकेवर दरवर्षी मोठा आर्थिक बोजा

Ganesh Kumar Mule Apr 23, 2026 9:22 PM

Hong Kong Lane Pune |  Contempt of the resolution of the GB by the Pune Municipal Administration 
Suhas Tingre NCP | पुण्यातील मोकाट जनावरांसाठी आधुनिक गोशाळा आणि पशुवैद्यकीय सुविधा उभारणार
Pune PMC News | न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी वेळेत करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याचे श्रीनाथ भिमाले यांचे निर्देश

PMPML Deficit | पीएमपीच्या तुटीत सातत्याने वाढ | महापालिकेवर दरवर्षी मोठा आर्थिक बोजा

 

 PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ( पीएमपीएमएल) २०२५-२६ या आर्थिक वर्षातील वाढत्या संचलन तुटीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून सुमारे ४८४.९६ कोटी रुपयांची हिस्सा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली. या रकमेचे समसमान मासिक हप्त्यांत वितरण करण्यात येणार असल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. (PMPML Pune)

पुण्यातील वाढती प्रवासी संख्या, इंधन खर्चातील वाढ आणि देखभाल खर्च यामुळे पीएमपीच्या तुटीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे महापालिकेवर दरवर्षी मोठा आर्थिक बोजा येत असून, यंदाही हीच परिस्थिती कायम राहिल्याचे या प्रस्तावावरून स्पष्ट झाले आहे.

२०२४-२५ या वर्षात पीएमपीची एकूण अंदाजित संचलन तूट सुमारे ८०८.२६ कोटी रुपये इतकी गृहित धरली आहे. शासनाच्या निर्देशानुसार या तुटीपैकी ६० टक्के हिस्सा महापालिकेने उचलायचा असून, त्यानुसार ही रक्कम ४८४.९६ कोटी रुपये इतकी ठरते. ही तरतूद महापालिकेच्या अंदाजपत्रकात ‘पीएमपीच्या संचलन तुटीचा हिस्सा’ या शीर्षाखाली करण्यात आली आहे.

दरम्यान, निवडणूक कार्यक्रम आणि सेवा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने एमएनजीएल कंपनीकडे थकित देयकांसाठी अपवादात्मक बाब म्हणून १० कोटी रुपये आगाऊ स्वरूपात देण्यासही मान्यता देण्यात आली आहे. ही रक्कम पुढील देयकांमधून समायोजित करण्यात येणार आहे. तसेच कर आकारणी व संकलन विभागाकडील काही थकबाकी आणि इतर समायोजनांद्वारेही निधी उभारणीची तरतूद प्रस्तावात नमूद आहे.

महापालिकेकडून ही संपूर्ण रक्कम एप्रिल २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीत १२ समसमान मासिक हप्त्यांमध्ये देण्याचे नियोजन आहे. त्यानुसार दरमहा अंदाजे ३९.५० कोटी रुपये पीएमपीला वितरित केले जाणार आहेत. तथापि, अंतिम लेखापरीक्षणानंतर तुटीच्या आकड्यात होणाऱ्या वाढ-घटीनुसार शेवटच्या हप्त्यात आवश्यक ते समायोजन करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

यासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीमार्फत मुख्य सभेसमोर ठेवण्यात येणार असून, मंजुरीनंतर अंमलबजावणीला वेग दिला जाणार आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पीएमपीला आर्थिक पाठबळ देणे आवश्यक असल्याचे प्रशासनाचे मत आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: