Latecomers PMC Employees and Officers | ५५० हून अधिक पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकारी “लेटकमर” | कारणे दाखवा नोटीसा देऊन घेतला जाणर खुलासा 

Homeadministrative

Latecomers PMC Employees and Officers | ५५० हून अधिक पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकारी “लेटकमर” | कारणे दाखवा नोटीसा देऊन घेतला जाणर खुलासा 

Ganesh Kumar Mule Aug 22, 2025 7:40 PM

MPSC Exam | MPSC च्या विद्यार्थ्यांचे पुण्यासह राज्यभरात आंदोलन
Shasan Aapalya Dari | पर्वती मतदारसंघात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम
Shivneri | Shiv jayanti | गड-किल्ल्यांचा इतिहास जपण्याचे काम शासन करेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Latecomers PMC Employees and Officers | ५५० हून अधिक पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकारी “लेटकमर” | कारणे दाखवा नोटीसा देऊन घेतला जाणर खुलासा

| या आधी दोन उपायुक्तांना दिली होती नोटीस

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कर्मचाऱ्यांना महापालिका कामकाजाच्या बाबतीत  शिस्त लावणे हे चांगलेच गंभीरपणे घेतले आहे.  त्याचाच आज प्रत्यय आला. महापालिकेची कामकाजाची वेळ ही सकाळी ९:४५ ला सुरू होते. मात्र कर्मचारी उशिरा येणे हे नित्याचे झाले आहे. हे मोडीत काढण्यासाठी आयुक्तांनी आज १० वाजून २० मिनिटांनी गेट बंद केले. त्यानंतर जवळपास ५५० कर्मचारी कामावर आले होते. म्हणजे हे सगळे लेटकमर कर्मचारी असल्याचे आढळून आले आहे. आता या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा पाठवून त्यांच्याकडून खुलासा घेतला जाणार आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

महापालिका कर्मचारी आपल्या कामकाजाच्या बाबतीत उदासीन असतात. तसेच कामाच्या वेळा पाळल्या जात नाहीत. अशा तक्रारी महापालिका आयुक्त यांच्याकडे गेल्या होत्या. ही गोष्ट महापालिका आयुक्त यांनी गंभीरपणे घेत कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अचानक आज महापालिका आयुक्त यांनी सुरक्षा विभागाला आदेश गेट बंद करण्याचे आदेश दिले. महापालिका कामकाजाची वेळ ही सकाळी ९:४५ ला सुरु होते. तर सायंकाळी ५:४५ पर्यंत कर्मचाऱ्यांनी काम करणे अपेक्षित आहे. मात्र कर्मचारी वेळा पाळताना दिसत नाहीत. त्यामुळे आज १० वाजून २० मिनिटांनी गेट बंद करण्यात आले. यात जवळपास ५५० हून अधिक कर्मचारी आणि अधिकारी  लेटकमर असल्याचे आढळून आले. यावेळी या कर्मचाऱ्या कडून त्यांचे नाव आणि हुद्दा आणि मोबाइल नंबर लिहून घेण्यात आला. आता या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागाकडून कारणे दाखवा नोटीसा पाठवल्या जातील. तसेच त्यांच्याकडून खुलासा घेतला जाईल. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

  • या आधी दोन उपायुक्तांना दिली होती नोटीस

    दरम्यान महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या आधी दोन उपायुक्त यांना कारणे दाखवा नोटिस दिली आहे. आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीला गैरहजर राहिल्या बद्दल ही नोटीस देण्यात आली होती. आयुक्तांनी त्यांच्याकडून खुलासा मागवला आहे.


महापालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार आम्ही आज सकाळी १० वाजून २० मिनिटांनी गेट बंद केले. जे अधिकारी आणि कर्मचारी उशीरा आले त्यांची नावे लिहून घेण्यात आली. आम्ही ही माहिती सामान्य प्रशासन विभागाला सादर केली. पुढील कारवाई सामान्य प्रशासन विभाग अतिरिक्त आयुक्त यांच्या माध्यमातून करणार आहे.

  • राकेश विटकर, सुरक्षा अधिकारी. 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0