Khadakwasla Dam | खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्यात किंचित वाढ | पुणेकर आणि महापालिकेची चिंता मिटली
Pune Rain – (The Karbhari News Service) – खडकवासला धरणसाखळीतील चार प्रमुख धरणांमध्ये आज सायंकाळपर्यंत समाधानकारक पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, या चार धरणांमध्ये एकूण ५.७४ टीएमसी (१९.७०%) पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ५.७१ टीएमसी (१९.५९%) होता, म्हणजेच यंदा थोडी वाढ दिसून येत आहे. दरम्यान या पावसामुळे पुणेकर आणि महापालिकेची चिंता मिटली आहे. कारण महापालिकेला मे आणि जून महिन्यात पाणीकपात बाबत कठोर निर्णय घ्यावे लागत असत. अशी वेळ आता येणार नाही, अशी आशा व्यक्त केली जात आहे. (Pune Water Supply)
खडकवासला धरणात आज २४ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, एकूण १३६१ मि.मी. पाऊस झाला आहे. सध्या धरणात ०.९८ टीएमसी पाणीसाठा असून, हे प्रमाण ४९.४२% आहे. धरणात ४८ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. आज दिवसभरात खडकवासला धरणातून स्पिलवेद्वारे पाणी सोडण्यात आले.
पानशेत धरणात आज २५ मि.मी. पाऊस झाला असून, एकूण ३१२९ मि.मी. पाऊस नोंदवला गेला आहे. धरणात सध्या १.९० टीएमसी (१७.८४%) पाणीसाठा आहे.
वारसगाव धरणाची स्थितीही चांगली असून, आज १७ मि.मी. पाऊस झाला आहे आणि एकूण ३१२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणात २.७२ टीएमसी (२१.२४%) पाणीसाठा अआहे.
टेमघर धरणात आज १५ मि.मी. पाऊस झाला असून, एकूण ४६१३ मि.मी. पाऊस झाला आहे. या धरणात ०.१४ टीएमसी (३.८८%) पाणीसाठा आहे.
सध्या या चार धरणांमध्ये मिळून ०५.७४ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे, जो एकूण क्षमतेच्या १९.७०% आहे. गेल्या वर्षी याच तारखेला हा साठा १९.५९% होता.
—
COMMENTS