Pune Rain | खडकवासला धरणातून ९ वाजता १० हजार ६११ क्यूसेक पाण्याचा विसर्ग  करण्यात येणार! 

Homeadministrative

Pune Rain | खडकवासला धरणातून ९ वाजता १० हजार ६११ क्यूसेक पाण्याचा विसर्ग  करण्यात येणार! 

Ganesh Kumar Mule Sep 15, 2025 8:51 AM

Water Crisis in pune | पुणेकरांवर पाणीसंकट | चालू आठवड्यापासूनच एक दिवसाआड पाणी! 
Khadakwasla Dam News | खडकवासला धरणातून रब्बी आवर्तन सुरू | नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता!
Heavy Rain in pune | बाहेर पडताना काळजी  घ्या | खडकवासला धरणातून 30 हजार क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग

Pune Rain | खडकवासला धरणातून ९ वाजता १० हजार ६११ क्यूसेक पाण्याचा विसर्ग  करण्यात येणार!

 

Khadakwasla Dam – (The Karbhari News Service) – खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 7677 क्युसेक वाढवून सकाळी 09.00 वा. 10611क्यूसेक करण्यात येणार आहे. तर 10611 क्युसेक विसर्ग वाढवून सकाळी 10.00 वा. 14547 क्यूसेक करण्यात येणार आहे.आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो.  तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी. असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.  (Pune News)

पुणे शहर आणि शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस बरसतो आहे. त्यातच चार ही धरणे आधीच १०० टक्के भरलेली होती. त्यात आता जोरदार पावसामुळे धरणातून पाणी विसर्ग करणे अनिवार्य झाले आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने धरणातून रात्रीपासून पाणी सोडणे सुरु केले आहे. पाऊस सुरूच असल्याने ९ वाजता हा विसर्ग १० हजार ६११ इतका करण्यात आला आहे.

आज  पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला असून पुढील ३ तासांत जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात विजांसह वादळी वारे आणि ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: