Ganesh Bidkar on Ravindra Dhangekar | देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांवर बोलणारे तोंड काळे करून पळाले! | बिल्डर आत्महत्या प्रकरणात गणेश बिडकरांचा धंगेकरांवर हल्लाबोल

HomeBreaking News

Ganesh Bidkar on Ravindra Dhangekar | देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांवर बोलणारे तोंड काळे करून पळाले! | बिल्डर आत्महत्या प्रकरणात गणेश बिडकरांचा धंगेकरांवर हल्लाबोल

Ganesh Kumar Mule Jul 19, 2026 7:21 PM

Vidhan Parishad Election | पुणे विधान परिषदेची जागा भाजपलाच मिळावी | सभागृह नेते गणेश बिडकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी
PMC Merged 23 Villages DP | पुणे महापालिका सभागृहाचा महत्त्वपूर्ण निर्णय |  समाविष्ट २३ गावांसाठी विकास आराखडा तयार करण्यास मान्यता
Pune PMC Tender Rate | देखभाल दुरुस्तीच्या कामाच्या ४०-४५% लो रेटने निविदा | कामाचा दर्जा कसा राहणार?’ : सभागृह नेते गणेश बिडकर यांचा सवाल

Ganesh Bidkar on Ravindra Dhangekar | देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांवर बोलणारे तोंड काळे करून पळाले! | बिल्डर आत्महत्या प्रकरणात गणेश बिडकरांचा धंगेकरांवर हल्लाबोल

 

Pune Breaking News – (The Karbhari News Service) – पुण्यातील एका बिल्डरच्या दुर्दैवी आत्महत्या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत. या प्रकरणातील आरोपी भूमिगत झाल्यावर भाजप नेते आणि पुणे महापालिका सभागृह नेते गणेश बिडकर यांनी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर थेट टीका केली आहे. “रोज देवेंद्रजींपासून चंद्रकांतदादांपर्यंत बोटं दाखवणारे आज तोंड काळे करून पळत आहेत,” अशा शब्दात बिडकरांनी निशाणा साधला. (Pune Builder Suicide Case)

बुधवारी पुण्यात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना गणेश बिडकर यांनी या प्रकरणातील 14 पैकी एकही आरोपी पोलिसांना सापडू नये, यावरून संताप व्यक्त केला.

 

 

बिडकर म्हणाले, “जो दुर्दैवी मृत्यू झालाय तो निश्चितच निंदनीय आहे. तो ज्या पद्धतीने आणि ज्या परिस्थितीत झाला याचा अभ्यास समाजातील प्रत्येक घटकांनी केला पाहिजे. ज्यांनी स्वतःला समाजाचे प्रमुख मानतात त्यांच्यासाठी हा धडा आहे.”

“या संदर्भात पोलिसांची 13 पथके शोधत आहेत. जे कोणी मोठे पदाधिकारी, स्वयंघोषित नेते होते ते आज भूमिगत झालेत. ही निंदनीय बाब आहे. याचा मी निषेध करतो. आलेल्या प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी आरोपींनी दाखवायला हवी होती. त्या कुटुंबाला धीर देण्याची गरज होती. अशा वेळी पळून जाणं ही चांगली गोष्ट नाही,” असेही ते म्हणाले.

या प्रकरणात आरोपींच्या भूमिकेवर टीका करताना बिडकर म्हणाले, “कायदेशीर प्रक्रिया चालू राहील. पण लोकांचा छोटेपणा निश्चितपणे समाजापुढे आलेला आहे. समाजाला हे कळून गेलंय की ही अत्यंत छोट्या मनाची आणि भित्रे माणसं आहेत. परिस्थितीला सामोरं जाण्याची हिम्मत यांच्यात नाही.”

“जर ते म्हणत असतील आम्ही त्यात नव्हतो, तर त्यांनी सामोरं जाऊन त्या कुटुंबियांना धीर देण्याची गरज होती. मला नाव घ्यायची इच्छा नाही. पण जे जे स्वयंघोषित नेते होते, रोज लोकांवर बोटं दाखवत होते, त्यांचीच आज बोटं त्यांच्यावर उठली आहेत. आज त्यांना समाजात तोंड लपवून फिरावं लागतंय,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

“उठसुठ देवेंद्रजींपासून चंद्रकांतदादांपर्यंत बोलत होते आणि आज आपल्याला तोंड काळे करून पळावं लागतंय. याच्यासारखी दुर्दैवी घटना नाही. 25 वर्षे ज्यांच्या कुटुंबासोबत संबंध आहेत अशा काळात तुम्ही पळालात, हे तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे नाही,” असे बिडकरांनी स्पष्ट केले.

या प्रकरणात पोलिसांनी 13 विशेष पथके तयार करून फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे. बिडकरांनी देखील कायद्याला कोणीही चकवू शकत नाही, लवकरच सर्व आरोपी सापडतील असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान या प्रकरणामुळे पुण्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र चांगलेच तापले असून, येणाऱ्या काळात याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: