PMC Standing Committee | मनपाच्या माजी-आजी सदस्यांच्या अपत्यांना देखील अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेच्या कक्षेत आणणार

Homeadministrative

PMC Standing Committee | मनपाच्या माजी-आजी सदस्यांच्या अपत्यांना देखील अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेच्या कक्षेत आणणार

Ganesh Kumar Mule Jul 20, 2026 7:25 AM

Ganesh Visarjan | गणेश विसर्जनानंतर मुर्तींचे छायाचित्रण व प्रसारणास मनाई – पुणे शहर पोलीस उपआयुक्तांचा आदेश
Balbharati-Poud Phata road | बालभारती-पौड फाटा रोडला शिवसेना (ठाकरे गट) चा विरोध | वेताळ टेकडी बचाव मोहिमेला समर्थन
Pune BJP Booth Chalo Abhiyan | लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शहर भाजपच्या वतीने 4 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत बूथ चलो अभियान

PMC Standing Committee | मनपाच्या माजी-आजी सदस्यांच्या अपत्यांना देखील अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेच्या कक्षेत आणणार!

| स्थायी समितीचा महत्वाचा ठराव

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या विकासासाठी काम केलेल्या सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कुटुंबियांना आता आरोग्याची सुरक्षा मिळत आहे. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने माजी नगरसेवक, शिक्षण मंडळ आणि पीएमटीचे माजी सदस्य त्यांचे पती/पत्नी आणि आता अपत्यांना देखील महापालिकेच्या अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेचा लाभ देण्यास मान्यता दिली आहे. (Pune Municipal Corporation CHS Scheme)

समितीत पारित झालेल्या या ठरावात म्हटले आहे की, पुणे शहराच्या विकासात, लोकसेवेत आणि प्रशासकीय कामकाजात माजी नगरसेवक, शिक्षण मंडळाचे सदस्य आणि पूर्वीच्या पुणे महानगरपालिका परिवहन उपक्रम समिती म्हणजेच पीएमटीच्या सदस्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

ठरावात नमूद करण्यात आले आहे की, सध्या वाढते वैद्यकीय खर्च आणि आरोग्याच्या वाढत्या समस्या लक्षात घेता, या सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधींना तसेच त्यांच्या कुटुंबाला सामाजिक आणि आरोग्यविषयक सुरक्षा देणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे.

सध्या पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ‘अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना’ राबवली जाते. या योजनेची व्याप्ती वाढवून लोकप्रतिनिधी व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांना वैद्यकीय कवच देणे आवश्यक असल्याचे मत स्थायी समितीने मांडले.

या ठरावानुसार खालील व्यक्ती आणि त्यांची कुटुंबे या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणार आहेत:

1. पुणे महानगरपालिकेचे सर्व आजी व माजी नगरसेवक
2. शिक्षण मंडळाचे सर्व आजी व माजी सदस्य
3. पूर्वीच्या पुणे महानगर परिवहन उपक्रम समिती म्हणजेच पीएमटीचे सर्व माजी सदस्य
4. वरील सर्वांचे पती/पत्नी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेली दिव्यांग अपत्ये

या सर्वांना पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या ‘अंशदायी वैद्यकीय सहाय्य’ योजनेचा लाभ देता यावा, यासाठी स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: