Ganesh Bidkar | सभागृह नेत्याचे नगरसेवकांना आवाहन :  अखंड कामाचे तुकडे करू नका, गुणवत्तेला बाधा येईल

Homeadministrative

Ganesh Bidkar | सभागृह नेत्याचे नगरसेवकांना आवाहन :  अखंड कामाचे तुकडे करू नका, गुणवत्तेला बाधा येईल

Ganesh Kumar Mule Aug 25, 2026 12:35 PM

Ganesh Bidkar BJP | गणेश बिडकर यांची पुणे महानगरपालिका निवडणूक प्रमुख पदी नियुक्ती! | मुरलीधर मोहोळ जिल्हा प्रभारी
Ganesh Bidkar on Ravindra Dhangekar | देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांवर बोलणारे तोंड काळे करून पळाले! | बिल्डर आत्महत्या प्रकरणात गणेश बिडकरांचा धंगेकरांवर हल्लाबोल
PMC Merged 23 Villages DP | पुणे महापालिका सभागृहाचा महत्त्वपूर्ण निर्णय |  समाविष्ट २३ गावांसाठी विकास आराखडा तयार करण्यास मान्यता

Ganesh Bidkar | सभागृह नेत्याचे नगरसेवकांना आवाहन :  अखंड कामाचे तुकडे करू नका, गुणवत्तेला बाधा येईल

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत सभागृह नेते गणेश बिडकर यांनी शहरातील विकासकामांच्या गुणवत्तेवर भर देत नगरसेवकांना महत्त्वाचे आवाहन केले. एखाद्या कामाची तरतूद जर एक कोटी रुपयांची असेल तर त्या कामाचे तुकडे करू नका, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

कामाचे तुकडे केल्यामुळे कामाची गुणवत्ता राहत नाही आणि त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या सुविधांवर होतो. त्यामुळे जिथे एक कोटीची तरतूद आहे तिथे अखंडपणे काम करावे, असा सल्ला बिडकर यांनी दिला.

नगरसेवकांना आपल्या प्रभागातील कामे सुचवण्याचा अधिकार असला तरी देखील कामाचे तुकडे करण्याची पद्धत टाळली पाहिजे, असेही बिडकर म्हणाले. अनेकदा एकच मोठे काम छोटे छोटे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी दाखवले जाते, त्यामुळे ठेकेदाराकडून गुणवत्तापूर्ण काम होत नाही आणि देखभाल दुरुस्तीचा खर्चही वाढतो.

शहरातील रस्ते, ड्रेनेज, पथदिवे आणि इतर पायाभूत सुविधांची कामे दर्जेदार व्हावीत यासाठी महापालिका प्रशासनानेही याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सभागृह नेते म्हणून कामाची गुणवत्ता आणि पारदर्शकता याला आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: