Dr Manmohan Singh | डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताच्या अर्थकारणाची दिशा बदलली – पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री
Dr Manmohan Singh – (The Karbhari News Service) – पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या (Pune Congress) वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांनी रविवार ५ जानेवारी रोजी सेंट्रल पार्क हॉटेल, डेक्कन जिमखाना, पुणे येथे भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची ‘‘सर्व पक्षीय श्रध्दांजली सभा’’ आयोजित केली होती. सदर सभेस सर्व राजकीय पक्षांचे नेते मंडळी उपस्थित होते. (Pune News)
सदर सभेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी डॉ. मनमोहन सिंग (Dr Manmohan Singh) यांच्या आठवणींना उजाळा देत श्रध्दांजलीपर भाषण केले ते म्हणाले की, ‘‘राजीवजी गांधी यांच्या हस्ते नंतर भारत मोठ्या आर्थिक संकटात होता. त्यावेळी नरसिंह राव यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर अर्थमंत्री पदाची जबाबदारी सोपविली अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांनी जबाबदारी सुध्दा स्विकारली. त्यांना अतिशय कठोर निर्णय सदर काळात घ्यावे लागले. डाव्या पक्षांचा त्यांना विरोध होता परंतु डॉ. मनमोहन सिंग यांनी सर्वांना समजावून सांगत अत्यंत मोठे क्रांतीकारक बदल केले त्यांचे हे काम इतिहास कधीही विसरणार नाही. त्यांना संसदेमध्ये विरोधक नेहमी वेडेवाकडे बालोयचे परंतु डॉ. मनमोहन सिंग यांनी भारत देश दिवाळखोरीतून बाहेत काढून विरोधकांच्या तोंडे बंद केली. डॉ. मनमोहन सिंग यांचे अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी अत्यंत सौदाहार्यपूर्ण संबंध होते. १९९१ ते १९९६ च्या काळात त्यांनी अर्थकारणाची दिशा बदलवून दाखविली. डाव्या पक्षांचा, समावादी पक्षांचा त्यांना विरोध होता तरी सुध्दा त्यांनी अमेरिकेसोबत करार केला. त्यांच्या काळात अणुवस्त्र करार पारित झाला, या कराराचा फायदा भारताला मोठ्या प्रमाणावर झाला. त्यांनी या काळात काही आमुलाग्र बदल केले. भारत हा महाशक्ती देश झाला. देशात एक वेगळ्या प्रकारचा ठसा त्यांनी स्वत:च्या कामातून उमटविला. त्यांनी सामाजिक क्षेत्रातील कायदे, माहिती अधिकार, मनरेगा, शिक्षण कायदा अमलात आणले. त्यांनी हक्क दिल्यामुळे अनेक चांगली कामे झाली. सुनामी झाली त्यावेळी स्वत: त्या ठिकाणी जावून पाहणी केली. २००८ चे आर्थिक मंदीचे संकट सोडविले. सत्यम कंपनीच्या मालकाने फ्रॉड केल्यामुळे देशाची प्रतिमा मलीन न होऊ देता महेंद्रा कंपनीला सत्यम कंपनी टेकओव्हर केली व भारताची प्रतिमा ढासळण्यापासून वाचविली. त्यांच्यात सक्षम निर्णय क्षमता होती. डॉ. मनमोहन सिंग यांचे वाक्य म्हणजे G.R. असायचा. त्यांच्या पत्रकार परिषदेची तयारी एक महिनाभर चालायची. डॉ. मनमोहन सिंग हे अतिशय परिश्रमातून व गरीबीतून आलेले व्यक्ती होते. त्यांनी त्यांच्या कादकिर्दीत देशातील दारिद्र्य रेषेकखालील लोकांना वर आणले. अशा या महान व्यक्तीमत्वास मी कोटी कोटी नमन करतो.’’
यानंतर पुणे शहराचे खासदार व केंद्रीय मंत्री नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे म्हणाले की, ‘‘डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधना नंतर त्यांचा जीवन प्रवास माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. त्यांची आई अशिक्षित असून देखील त्यांनी विदेशात शिक्षण घेतले. विरोधक त्यांना नेहमी कमी- बोलतो म्हणून बोलले की ते त्यांना ‘RBI गव्हर्नर कमी बोलतो पर काम जास्त करतो’ असे उत्तर द्यायचे. त्यांनी कधीही विरोधकांना अपशब्द वापरले नाही. डॉ. मनमोहन सिंग ही अशी व्यक्ती आहे की त्यांचा कोणताही राजकारणी द्वेष करू शकत नाही. त्यांनी कधीही राजकारणी भावनेने आचरण केले नाही. जागतिक स्तरावर आपल्या देशाला मजबूत अर्थव्यवस्था प्राप्त करून दिली. त्यांना पंतप्रधान पदाचा अभिमान नव्हता तर भारतीयांचा सेवक म्हणून अभिमान होता. त्यांच्या जाण्याने देशातील सामान्य माणूस सुध्दा हळहळला. स्वच्छ चारित्र्य, स्वच्छ प्रतिमा जगाच्या इतिहासात त्यांचे नाव नेहमी अग्रगण्या राहणार. त्यांच्या जाण्यामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे.’’
या श्रध्दांजली सभेचे प्रास्ताविक माजी नगरसेवक अविनाशजी बागवे यांनी केले तर सूत्रसंचालन सौ. प्राची दुधाने यांनी केले.
सदर सभा सुरू होण्यापूर्वी डॉ. मनमोहन सिंग यांच्या आत्म्यास शांती मिळणेसाठी सर्वधर्मिय प्रार्थना करण्यात आली. यावेळी राहुल ताथोडे गुरूजी, गजानन जोशी गुरूजी, ज्ञानी मुक्तियार सिंहजी, भन्ते सुदस्सन, बिशप नरेश अंबाला, मौलाना सईद सैय्यद आदी धर्मगुरूंनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली.
यावेळी चंद्रकांत दादा पाटील (उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य), भोलासिंग अरोरा जी (अध्यक्ष गुरुद्वारा, गणेश पेठ), जांबुवंत मनोहर (समाजवादी पक्ष), प्रशांतजी जगताप (अध्यक्ष राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार गट), प्रदीप देशमुखजी (प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट), विश्वांभर चौधरी (सामाजिक कार्यकर्ते), मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड आदींची श्रध्दांजलीपर भाषण झाली.
यावेळी शीख समाजाच्या वतीने भाई लवप्रीत सिंह जी यांच्या किर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला तसेच ज्ञानी मुक्तियार सिंह जी यांनी कथा सांगितली. गुरूद्वारा गणेश पेठ यांच्या वतीने उपस्थित सर्वांना कडा प्रसाद देण्यात आला.
यावेळी माजी आमदार उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, वीरेंद्र किराड, राष्ट्रवादीचे अंकुश काकडे, बाळासाहेब दाभेकर, गोपाळ तिवारी, रफिक शेख, दत्ता बहिरट, सौरभ अमराळे, अजित दरेकर, मेहबुब नदाफ आदी व्यासपीठावर उपस्थित होते. त्याचबरोबर सर्व राजकीय पक्षांचे व सामाजिक संघटनाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS