PMC Deputy Commissioner | सामान्य प्रशासन विभाग अखेर महापालिका अधिकाऱ्याकडे! | आकाशचिन्ह विभाग संदीप कदम, घनकचरा विभाग ची पूर्ण जबाबदारी संतोष वारुळे यांच्यावर!

Homeadministrative

PMC Deputy Commissioner | सामान्य प्रशासन विभाग अखेर महापालिका अधिकाऱ्याकडे! | आकाशचिन्ह विभाग संदीप कदम, घनकचरा विभाग ची पूर्ण जबाबदारी संतोष वारुळे यांच्यावर!

Ganesh Kumar Mule May 19, 2026 9:45 PM

Junior Engineer | PMC | कनिष्ठ अभियंता पदावर अश्विनी वाघमारे यांना नियुक्त करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
Meri Life Mera Swachh Shahar | PMC Pune | पुणे महापालिकेकडून करण्यात आली RRR केंद्राची स्थापना
PMPML Reward Scheme | पीएमपीएमएल आपल्या प्रवाशांना देणार शंभर रुपयांचे बक्षीस | योजना जाणून घ्या सविस्तर 

PMC Deputy Commissioner | सामान्य प्रशासन विभाग अखेर महापालिका अधिकाऱ्याकडे! | आकाशचिन्ह विभाग संदीप कदम, घनकचरा विभाग ची पूर्ण जबाबदारी संतोष वारुळे यांच्यावर!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी महापालिका उपायुक्त यांच्या बदल्या केल्या आहेत. अनपेक्षितपणे करण्यात आलेल्या या बदल्याने महापालिकेत आश्चर्याची भावना व्यक्त केली जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामान्य प्रशासन विभाग खूप वर्षांनी महापालिका अधिकाऱ्याकडे आला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

विजयकुमार थोरात यांच्याकडील सामान्य प्रशासन विभाग उपायुक्त किशोरी शिंदे यांच्याकडे देण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाला महापालिकेचा शेवटचा अधिकारी हा सह महापालिका आयुक्त अरुण पाटील होते. त्यांनंतर उपायुक्त पद निर्माण करण्यात आले. तेव्हापासून या विभागाला राज्य सरकार कडून आलेला प्रति नियुक्ती वरील अधिकारी दिला जात होता. खूप वर्षांनी हा बदल करण्यात आलेला आहे.

दरम्यान थोरात यांच्याकडे परिमंडळ ३ ची जबाबदारी देण्यात आली आहे. माधव जगताप यांच्या कडील आकाशचिन्ह आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग काढून घेण्यात आला आहे. आकाशचिन्ह विभाग उपायुक्त संदीप कदम यांच्या कडे देण्यात आला आहे. तर आपत्ती व्यवस्थापन चा प्रभारी पदभार गणेश सोनुने यांच्याकडे देण्यात आला आहे. जगताप यांच्याकडे परिमंडळ ६, पर्यावरण, मंडई विभाग, मुद्रणालय, उपायुक्त (विशेष) विभाग देण्यात आला आहे.

मध्यवर्ती भांडार विभाग उपायुक्त संदीप खलाटे यांच्याकडे देण्यात आला आहे. उपायुक्त संतोष वारुळे यांना घनकचरा विभाग विभागून देण्यात आला होता. मात्र आता या विभागाचा संकलन आणि प्रक्रियाचा कारभार वारुळे यांच्याकडे देण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर यांना प्रभारी उपायुक्त चा दर्जा देऊन त्यांना निवडणूक आणि दक्षता विभागाचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: