PMC Officers Transfer | अभियांत्रिकी संवर्गातील मुख्य आणि अधिक्षक अभियंता यांच्या बदल्या  | महापालिका आयुक्त यांचे आदेश

Homeadministrative

PMC Officers Transfer | अभियांत्रिकी संवर्गातील मुख्य आणि अधिक्षक अभियंता यांच्या बदल्या | महापालिका आयुक्त यांचे आदेश

Ganesh Kumar Mule May 20, 2026 8:21 AM

Supriya Sule Vs CM | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुप्रियाताईंना का वाटते काळजी? सुप्रियाताईंनी दिले स्पष्टीकरण 
Pune PMC News | विविध विषय समित्यांच्या निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता! | विरोधी पक्षाकडून कुणाचाही अर्ज नाही 
PMC 360 | राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२६ मध्ये पुणे महानगरपालिकेच्या ‘पीएमसी ३६०’ प्रकल्पाची सिल्व्हर अवॉर्डसाठी निवड

PMC Officers Transfer | अभियांत्रिकी संवर्गातील मुख्य आणि अधिक्षक अभियंता यांच्या बदल्या

| महापालिका आयुक्त यांचे आदेश

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या अभियांत्रिकी संवर्गातील मुख्य अभियंता (स्थापत्य) आणि अधिक्षक अभियंता (स्थापत्य) या पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान कार्यकारी अभियंता दिनेशकुमार गिरोल्ला यांना पहिल्यांदाच खातेप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. (Naval Kishore Ram IAS)

मुख्य अभियंता जगदीश खानोरे यांच्याकडे मलनिस्सारण, देखभाल आणि दुरुस्ती हा विभाग देण्यात आला होता. मात्र हा विभाग आता दिनेशकुमार गिरोल्ला यांच्याकडे देण्यात आला आहे. तर खानोरे यांच्याकडे परम प्रकल्प ची पूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. गिरोल्ला यांनी मूळ कामकाज सोबत अतिरिक्त पदभार दिला आहे.

अधिक्षक अभियंता विशाल हरिभक्त यांना भवन रचना विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. अधिक्षक अभियंता अशित जाधव यांना पथ च्या ऐवजी पाणीपुरवठा विभागात काम देण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता रोहिदास गव्हाणे यांना देखील पथ चा प्रभारी पदभार देण्यात आला आहे. तर कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांना बांधकाम विभागाचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: