HPMV Virus | HPMV विषाणू बाबत पुणे महापालिकेने केले नागरिकांना हे आवाहन! 

Homeadministrative

HPMV Virus | HPMV विषाणू बाबत पुणे महापालिकेने केले नागरिकांना हे आवाहन! 

Ganesh Kumar Mule Jan 06, 2025 9:21 PM

PMC Pune Health Schemes | आरोग्य योजनांमध्ये पुणे महापालिकेची रँकिंग सुधारली!
Senior Citizens Health | PMC Health Department | शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणार पुणे महापालिका
PMC PCPNDT | सावित्रीबाईंच्या नावाचा पुरस्कार आनंददायी, पण जबाबदारी वाढवणारा | डॉ. वैशाली जाधव

HPMV Virus | HPMV विषाणू बाबत पुणे महापालिकेने केले नागरिकांना हे आवाहन!

 

PMC Health Department – (The Karbhari News Service) – सध्या चीनमध्ये Human Metapneumovirus (HPMV) उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडस मध्ये २००१ मध्ये आढळला. मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे. ज्यामुळे व श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास (सर्दी सारख्या) कारणीभूत ठरते. हा एक हंगामी रोग आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लू प्रमाणे हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. या अनुषंगाने डीजीएचएस आणि संचालक, एन सी डी सी दिल्ली यांनी दिनांक ३ जानेवारी २०१५ रोजी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील धसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. वर्ष २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही.

पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात दिनांक ३ जानेवारी २०२५ च्या शासन परिपत्रकातील मार्गदर्शन सूचनांनुसार कार्यवाही करण्यात येत असून तशा सूचना क्षेत्रिय स्तरावरून देण्यात आलेल्या आहेत.

महाराष्ट्रात व पुणे महानगरपालिका कार्य क्षेत्रात आतापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही. तथापि खबरदारीचा एक भाग म्हणनू नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये. या संदर्भातील सुचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ नीना बोराडे आणि सहायक आरोग्य अधिकारी  डॉ वैशाली जाधव यांच्याकडून करण्यात आले आहे.

हे करा :

> जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टीश्यू पेपरने झाका.
> साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.
-> ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणां पासून दूर राहा.
> भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा.
> संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायूविजन (व्हेंटीलेशन) होईल याची दक्षता घ्या.

हे करू नयेः

> हस्तांदोलन
> टीश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर
> आजारी लोकांशी जवळचा संपर्क
> डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे.
> सार्वजनिक ठिकाणी थुंकणे.
> डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे (सेल्फ मेडिकेशन) घेणे.

चीनमधून आलेल्या नवीन विषाणू Human Metapneumovirus (HMPV) अहवालांबाबत चिंतेचे कारण नाही. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भीतीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही. आरोग्य विभागामार्फत जनजागृती करण्यात येत असून डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालया मध्ये ५० आयसोलेशन बेड व ५ आय. सी. यु. बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शासकीय, निमशासकीय व खाजगी आरोग्य संस्थांना आपत्कालीन परीस्थिती हाताळण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांच्या स्तरावरून सूचित करण्यात आले आहे. असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0