Pune PMC News | वृक्षगणनेची निविदा रद्द करून फक्त समाविष्ट गावांतील वृक्षगणना करण्यासाठी निविदा मागवा | विरोधी पक्ष नेत्यांचा स्थायी समिती समोर प्रस्ताव

HomeBreaking News

Pune PMC News | वृक्षगणनेची निविदा रद्द करून फक्त समाविष्ट गावांतील वृक्षगणना करण्यासाठी निविदा मागवा | विरोधी पक्ष नेत्यांचा स्थायी समिती समोर प्रस्ताव

Ganesh Kumar Mule May 19, 2026 7:55 PM

PMC Employees | लेखनिकी संवर्गातील ८६ कर्मचाऱ्यांना उप अधिक्षक पदावर पदोन्नती!
PMC Election Code of Conduct | पुणे महापालिका आयुक्तांकडून आचारसंहिते बाबत आदेश जारी 
Annasaheb Waghire College Otur | किशोरवयीन मुला-मुलींचे खरे मित्र हे आई-वडील | डॉ. अनुष्का शिंदे

Pune PMC News | वृक्षगणनेची निविदा रद्द करून फक्त समाविष्ट गावांतील वृक्षगणना करण्यासाठी निविदा मागवा | विरोधी पक्ष नेत्यांचा स्थायी समिती समोर प्रस्ताव

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – सार आय. टी कंपनीची वृक्षगणनेची निविदा रद्द करून फक्त नव्याने समाविष्ठ गावांसाठी वृक्षगणना करण्यासाठी नव्याने निविदा मागविण्यात यावी. असा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. विरोधी पक्षनेता निलेश निकम व नगरसेवक दत्ता धनकवडे यांनी हा प्रस्ताव दिला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

प्रस्तावात म्हटले आहे कि,  पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील वृक्षगणना करणे कामी प्रशासनाने सारआय. टी या कंपनीला २९.८७ कोटी रुपयाची निविदा मान्यतेसाठी चे विषयपत्र तयार केले आहे. पुणे शहरातील वृक्षगणना २०१७ या आर्थिक वर्षात सुरु करून २०२४ या साली पूर्ण झालेली आहे. त्या गणनेनुसार पुणे शहरात ५८ लाख वृक्ष आहेत. तसेच २०१७ ते २०२६ या कालवधीत किती वृक्ष काढण्यासाठी परवानगी दिली याच्या सर्व नोंदी वृक्ष प्राधिकरण विभागाकडे उपलब्ध आहेत. तसेच या कालवधीत नव्याने केलेल्या वृक्ष लागवडीच्या नोंदी सुध्दा या विभागाकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे फक्त २०१७ नंतर नव्याने समाविष्ठ झालेल्या गावांतील वृक्षगणना करावी.

प्रस्तावात पुढे म्हटले आहे कि, सार आय.टी या कंपनीने मिळकतकर विभागाने जी आय, एस मॅपिंगचे कामामध्ये ८८% चुका केल्या आहेत. तसेच या कंपनीच्या २ कर्मचारी यांच्या वर बनावट स्वाक्षरी प्रकरणी मनपाने गुन्हा दाखल केलेला आहे व कंपनीला ब्लॅक लिस्ट करून त्यांचे १२. कोटी रुपये जप्त केलेले आहेत. या बाबींचा विचार करून  सारा आय. टी कंपनीची वृक्षगणनेची निविदा रद्द करून फक्त नव्याने समाविष्ठ गावांसाठी वृक्षगणना करणे कामी नव्याने निविदा मागविण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: