Shrinath Bhimale on PMC Projects | काचेचा पूल, रिव्हर फ्रंट, रोपवे प्रकल्पांची स्थायी समिती अध्यक्षांकडून पाहणी

Homeadministrative

Shrinath Bhimale on PMC Projects | काचेचा पूल, रिव्हर फ्रंट, रोपवे प्रकल्पांची स्थायी समिती अध्यक्षांकडून पाहणी

Ganesh Kumar Mule Apr 17, 2026 8:15 PM

7th Pay Commission | PMC Pune Employees | सातव्या वेतन आयोगातील वेतन निश्चितीबाबत मुख्य वित्त व लेखा अधिकाऱ्यांचे महत्वाचे आदेश
Pune PMC Budget | समाविष्ट गावांच्या विकासाला गती; पाणी, रस्ते, आरोग्य आणि उद्यानांवर भर | मिसिंग लिंक, रस्ते दत्तक योजना | भूसंपादनाकरिता ४०० कोटी रुपयांची तरतूद
Water supply | PMC pune | जलवाहिनीच्या कामामुळे शहराच्या काही भागात पाणीपुरवठा होणार विस्कळीत | जाणून घ्या  सविस्तर 

Shrinath Bhimale on PMC Projects | रिव्हर फ्रंट, रोपवे, काचेचा पूल प्रकल्पांची स्थायी समिती अध्यक्षांकडून पाहणी

 

PMC Budget – (The Karbhari News Service) – महानगरपालिकेच्या या वर्षीच्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची आज स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. (Pune PMC News)

शहराच्या पर्यटनवृद्धी, सौंदर्यीकरण आणि नागरिकांच्या सोयी-सुविधा वाढविण्यावर भर देणाऱ्या या प्रकल्पांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

सकाळी सारसबाग येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसरात प्रस्तावित काचेच्या पुलाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा शेकटकर, उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे तसेच प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता दिनकर गोजारे उपस्थित होते. मंदिर ट्रस्टींसोबत चर्चा करून प्रकल्पाची सद्यस्थिती, तांत्रिक बाबी आणि पुढील अंमलबजावणीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यानंतर सारसबाग ते पर्वती दरम्यान प्रस्तावित रोप-वे प्रकल्पाच्या अनुषंगाने संबंधित जागेची पाहणी करण्यात आली. या प्रकल्पामुळे शहरातील पर्यटनाला चालना मिळणार आहे.

पुणे महानगरपालिकेच्या नदी सुधारणा प्रकल्पांतर्गत रिव्हर फ्रंट येथील संगमवाडी भागाची पाहणी करण्यात आली. सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर लंडन आयच्या धर्तीवर उभारण्यात येणाऱ्या ‘पुणे रिव्हर फ्रंट एक्सपीरियन्स पार्क’ प्रकल्पाबाबतही चर्चा करून पुढील नियोजनासंदर्भात सूचना देण्यात आल्या.

यावेळी बोलताना अध्यक्ष भिमाले यांनी सांगितले की, “हे सर्व प्रकल्प पुण्याच्या पर्यटनाला नवी ओळख देणारे ठरणार असून शहराच्या सौंदर्यात आणि नागरिकांच्या सोयी-सुविधांमध्ये मोलाची भर घालतील. पुणे अधिक आधुनिक, आकर्षक आणि गतिमान शहर बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: