Pune Tree Cutting | वृक्ष तोड परवानगीची माहिती मनपाच्या संकेतस्थळावर जाहीर करा – सामाजिक कार्यकर्ते यांची मागणी
| नागरिकांच्या सहभागासाठी पारदर्शकता आवश्यक असल्याचा मुद्दा
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे शहरात शासकीय संस्था, पुणे महानगरपालिका आणि खासगी व्यक्तींनी दिलेल्या वृक्ष तोड, झाडे लावणे वृक्ष संवर्धनाच्या परवानगीची संपूर्ण माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर तातडीने प्रसिद्ध करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रुपेश राम केसेकर यांनी वृक्ष प्राधिकरणाकडे केली आहे. (Rupesh Kesekar)
केसेकर यांनी ८ जून ला वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा आयुक्त यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे. पुण्यात नागरीकरण, तसेच विविध शासकीय संस्था आणि खासगी विकासकांमार्फत वृक्ष तोड, झाडे लावणे आणि वृक्षांची संख्या कमी करण्याच्या परवानग्या मोठ्या प्रमाणात दिल्या जात आहेत. मात्र त्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याचे त्यांचे निरीक्षण आहे.
पारदर्शकतेसाठी मागणी
पत्रात म्हटले आहे की, सबंध शहरातील नागरिकांना पारदर्शक माहिती मिळावी. वृक्ष संगोपन, संवर्धन योग्य पद्धतीने राबवले जावे, नागरिकांमार्फत कितीमा वृक्षांची नोंदणी करून त्यांच्या भागातील झाडांची कमतरता भरून काढण्यासाठी प्रयत्न व्हावेत. तसेच वृक्ष तोड करणाऱ्यांनी आजवर किती वृक्ष लावले आणि त्यांची संगोपन केले, याची माहितीही नागरिकांना मिळावी.
यासाठी वृक्ष तोड परवानगी, वृक्ष संगोपन, संवर्धन योग्य पद्धतीने राबवले जावे, नागरिकांमार्फत कितीमा वृक्षांची नोंदणी करून त्यांच्या भागातील झाडांची कमतरता भरून काढण्यासाठी प्रयत्न व्हावेत. तसेच वृक्ष तोड करणाऱ्यांनी आजवर किती वृक्ष लावले आणि त्यांची संगोपन केले, याची माहितीही नागरिकांना मिळावी.
येणाऱ्या पावसाळ्यात उपयुक्त ठरणार
केसेकर यांनी म्हटले आहे की, सदर मागणीवर तातडीने कारवाई झाल्यास येणाऱ्या पावसाळ्याच्या काळात नवीन वृक्ष लागवड करणे अधिक सुलभ होऊ शकेल. त्यामुळे वरील माहिती तात्काळ जाहीर करावी.
सदर अर्जावर आपले म्हणणे कळवण्यात येणाऱ्या कार्यवाही बाबत १५ दिवसांत अवगत करावे, अशी विनंतीही पत्रात करण्यात आली आहे.
पत्राची प्रत माहितीसाठी आणि योग्य त्या कार्यवाहीसाठी महापौर, पुणे महानगर पालिका यांना पाठवण्यात आली आहे.

COMMENTS