Pune Local Holiday 2026 | पुणे जिल्ह्यात दिवाळीनिमित्त ९ नोव्हेंबरला स्थानिक सुट्टी; धनत्रयोदशीची ६ नोव्हेंबरची सुट्टी रद्द

पुणे जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी ९ नोव्हेंबर रोजी स्थानिक सुट्टी; सुधारित आदेश जारी.

Homeadministrative

Pune Local Holiday 2026 | पुणे जिल्ह्यात दिवाळीनिमित्त ९ नोव्हेंबरला स्थानिक सुट्टी; धनत्रयोदशीची ६ नोव्हेंबरची सुट्टी रद्द

Ganesh Kumar Mule Oct 23, 2026 8:06 PM

MSEDCL Smart Meter | पुण्यात पथदिवे, सिग्नल बंद; महावितरणच्या मीटर अपडेटचा फटका! | ७ कोटी भरूनही वीजपुरवठा खंडित | पुणे महापालिकेचा खुलासा
Pune PMC STP Project | ड्रेनेज निविदांवरून महापालिका प्रशासनाला विरोधी पक्षनेत्यांचा इशारा | ‘जायका’तील ४१ कोटींच्या भाववाढीवरही प्रश्नचिन्ह!
Pune Dengue Cases 2026  | पुण्यात डेंग्यूचा उद्रेक! १० महिन्यांत २,४१३ रुग्ण; महापालिकेची धडक मोहीम, ६.३० लाखांचा दंड वसूल

Pune Local Holiday 2026 | पुणे जिल्ह्यात दिवाळीनिमित्त ९ नोव्हेंबरला स्थानिक सुट्टी; धनत्रयोदशीची ६ नोव्हेंबरची सुट्टी रद्द

| विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांचे सुधारित आदेश जारी; जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी लागू**

 

Pune Diwali Holiday – The Karbhari News Service – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी जाहीर करण्यात आलेल्या स्थानिक सुट्टीत बदल करण्यात आला आहे. शुक्रवार, ६ नोव्हेंबर २०२६ रोजी धनत्रयोदशीनिमित्त जाहीर करण्यात आलेली स्थानिक सुट्टी रद्द करून, त्याऐवजी सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळीनिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे सुधारित आदेश विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी जारी केले आहेत. (Sheetal Teli Ugale IAS)

पुणे जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी यापूर्वी जाहीर केलेल्या स्थानिक सुट्ट्यांच्या यादीत सुधारणा करण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त ९ नोव्हेंबर रोजी सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने, पूर्वी ६ नोव्हेंबर रोजी निश्चित केलेली सुट्टी आता त्या दिवशी लागू राहणार नाही.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या १४ मार्च १९८३ रोजीच्या अधिसूचनेनुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून विभागीय आयुक्तांनी हे सुधारित आदेश जारी केले आहेत.

या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील संबंधित शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या सुट्ट्यांच्या नियोजनात बदल झाला आहे. नागरिकांनी शासकीय कामांसाठी कार्यालयात जाण्यापूर्वी सुधारित सुट्टीची नोंद घ्यावी.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: