Congress on Illegal Hoardings | शहरातील अनधिकृत फलकांचे सर्वेक्षण करण्यासाठी एजन्सीवर लाखो रुपये खर्च करू नयेत | कॉंग्रेस ची प्रशासनाकडे मागणी 

Homeadministrative

Congress on Illegal Hoardings | शहरातील अनधिकृत फलकांचे सर्वेक्षण करण्यासाठी एजन्सीवर लाखो रुपये खर्च करू नयेत | कॉंग्रेस ची प्रशासनाकडे मागणी 

Ganesh Kumar Mule Apr 17, 2026 8:44 PM

PMC Election Ward Structure | आज सायंकाळी महापालिका प्रारूप प्रभाग रचना होणार जाहीर! | क्षेत्रीय कार्यालयात लावले जाणार नकाशे
PMC Contract Labour Bonus Circular | कंत्राटी कामगारांचे बोनस बाबतचे धोरण जाहीर | २३१० ते ३७७५ रु इतकी होणार वेतनात वाढ!  | दिवाळीला १० हजारांची उचल देखील दिली  जाणार!
Prashant Jagtap on Pune Rain | पूर परिस्थितीला पुणे महानगरपालिका व पाटबंधारे विभाग जबाबदार | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Congress on Illegal Hoardings | शहरातील अनधिकृत फलकांचे सर्वेक्षण करण्यासाठी एजन्सीवर लाखो रुपये खर्च करू नयेत | कॉंग्रेसची प्रशासनाकडे मागणी

 

Sunil Shinde Congress – (The Karbhari News Service) – शहरात अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंग किती आहेत, याची मोजणी करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार असल्याची घोषणा  स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी नुकतीच केली होती. याला कॉंग्रेस ने विरोध केला आहे. एजेन्सी नियुक्त न करता हे काम आकाशचिन्ह विभागाच्या निरीक्षक यांच्या कडून करून घ्यावे. महापालिकेचे लाखो रुपये वाया घालवू नयेत, अशी मागणी कॉंग्रेस चे स्वीकृत नगरसेवक सुनील शिंदे यांनी आकाशचिन्ह विभागाच्या उपायुक्त यांच्याकडे केली आहे. (Pune Illegal Hoardings)

 

सुनील शिंदे यांच्या निवेदना नुसार  पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात अनधिकृत जाहिरात फलक असून सदर अनधिकृत जाहिरात फलक तयार होत असताना पुणे महानगरपालिकेचे संबधित आधिकारी यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे हे स्पष्ट झाले आहे. शहरात असे किती अनधिकृत फलक आहेत याची सविस्तर यादी आम्हास द्यावी तसेच अनधिकृत फलक तयार झाल्याने संबधित आधिकाऱ्यावर कारवाई करावी. सध्या पुणे शहरातील अनधिकृत फलक यांचे सर्वैक्षण करण्यासाठी एजन्सी अथवा सल्लागार नेमण्याची कार्यवाही चालू आहे असे समजते. यावर महानगरपालीकेचे लाखो रूपये खर्च होणार आहेत. परंतु सध्या प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयामधे परवाना व आकाशचिन्ह विभागाचे निरीक्षक कार्यरत असून ते काय काम करतात असा प्रश्न त्या निमित्ताने तयार झाला आहे. सदर निरीक्षक मार्फत अनधिकृत जाहीरात फलकांचे सर्वेक्षण करुन त्यावर कारवाई करण्याबाबतचे नियोजन करावे. एजन्सी अथवा सल्लागार नेमून महानगरपालिकेचे लाखो रूपये घालवू नयेत सबब या प्रकरणी  सर्व निरिक्षक यांच्या समवेत आंम्हास बोलवून‌ एक बैठक आयोजित करावी. असे शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: